माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ED कोठडीमध्ये 12 नोव्हेंबरपर्यंत वाढ - Mumbai Tak - high court remands maharashtras former home minister anil deshmukh to enforcement directorate custody till 12th november - MumbaiTAK
बातम्या

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ED कोठडीमध्ये 12 नोव्हेंबरपर्यंत वाढ

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या ईडी कोठडीत आहेत. त्यांची दिवाळी तुरुंगात गेली, त्यानंतरचे पुढचे दिवसही तुरुंगात जाणार आहेत. कारण त्यांच्या ईडी कस्टडीत 12 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या निर्णयाला ईडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची […]

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या ईडी कोठडीत आहेत. त्यांची दिवाळी तुरुंगात गेली, त्यानंतरचे पुढचे दिवसही तुरुंगात जाणार आहेत. कारण त्यांच्या ईडी कस्टडीत 12 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या निर्णयाला ईडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची पुन्हा ईडी कोठडीत रवानगी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर शनिवारी (6 नोव्हेंबर 2021) पुन्हा कोठडी संपल्याने न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता त्यांच्या कोठडीत 12 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

100 कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून समोर आलेले नव्हते. अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे.

Anil Deshmukh: मोठी बातमी.. अखेर अनिल देशमुख ED कार्यालयात दाखल, नेमकं काय घडलं?

अनिल देशमुखांचा मुलगाही ईडीच्या रडारवर

यापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख याला चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्याला चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, देशमुख यांच्या वकिलाने हृषिकेश देशमुख याच्या वतीनेही अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला ज्यावर कोर्टात 12 नोव्हेंबर 2021 रोजी सुनावणी होणार आहे.

काय प्रकरण आहे?

25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ कार सापडली होती. या प्रकरणात मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझेचे नाव समोर आले होते. यानंतर याप्रकरणी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची महाराष्ट्र सरकारने आयुक्त पदावरुन हटवलं होतं. यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खळबजनक पत्र लिहिलं होतं. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाझे याच्याकडे दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचा दावा परमबीर सिंग यांनी या पत्रात केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three + twenty =

रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट? राघव-परिणीती यांची कशी झाली पहिली भेट? पाहा Photo Ganesh Visarjan : गणपती चालले गावाला… मुंबईत दणक्यात होणार बाप्पाचं विसर्जन! Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाचं महत्त्व काय? आमिर खान पोहचला बाप्पाच्या दर्शनासाठी, हात जोडून केली प्रार्थना… Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘या’ रस्त्यांवरून जाणं टाळाच भारतीय क्रिकेटर तापाने फणफणले! रोहित शर्मा म्हणाला.. 10 वर्षांनी मोठ्या सैफसोबत कशी सुरूये करिनाची मॅरेज लाईफ? लग्नानंतर परिणीती चोप्रा मुंबई सोडून जाणार? कारण… ठाण्यात फ्लॅटमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा Viral VIDEO भूमी पेडणेकरची Butt Bag, किंमत तब्बल… ओठांच्या आकारावरून समजते पर्सनॅलिटी, तुमची कशी आहे ओळखा? रिकाम्या पोटी गोड पदार्थांचं सेवन टाळा! नाहीतर… दारूचा ‘पेग’ कसा आला? काय आहे अर्थ? भारतीय क्रिकेटरला ‘देवी’ म्हणत चिनी फॅन पोहोचला 1300 किमी दूर! शाहरुखच्या ‘जवान’ने 18 दिवसांत पार केला 1000 कोटींचा गल्ला पण…