संभाजी भिडे यांनी आजवर केलेली वादग्रस्त वक्तव्य!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्वाती चिखलीकर, सांगली

सांगली: ‘स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे.’ असं अत्यंत वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या संभाजी भिडे यांनी काल (15 ऑक्टोबर) पुन्हा एकदा अशाच प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सांगलीमध्ये दुर्गामाता दौडीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी आतापर्यंत अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. ज्यावरुन त्यांच्यावर सातत्याने टीका देखील होते. मात्र, असं असलं तरीही संभाजी भिडे वारंवार अशी वक्तव्य करत राहतात. जाणून घेऊयात आतापर्यंत त्यांनी कोणकोणती वादग्रस्त विधानं केली आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘निर्लज्ज लोकांचं देश म्हणजे हिंदुस्थान’

‘जगाच्या पाठीवर 187 राष्ट्र आहे. या राष्ट्रात आपल्याला गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा विषमपणा वाटत नाही, लाज वाटत नाही.. अशा बेशरम लोकांचा… जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश आहे. एक नंबर लोकसंख्या असलेला देश चीन आहे. 1 अब्ज 23 कोटी लोकांचा देश जगात आहे. प्रदीर्घ काळ परकियांचा मार खात, परकियांचं दास्यत्व करत, परकियांचं खरकटं-उष्टं खात.. स्वाभिमानाची शून्य जाणीव नसलेला निर्लज्ज लोकांचा देश ज्याचं नाव आहे हिंदुस्थान.’ असं वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी यावेळी केलं आहे.

ADVERTISEMENT

पुढे ते असंही म्हणाले की, ‘कोरोना म्हणजे चीन, पाकिस्तान या आपल्या शत्रू देशांनी काल्पनिकरित्या भारतात केलेला छुपा वार आहे. तो काही खरा नसून थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. दुर्देवाने आपल्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या अंतःकरणात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची वस्ती असती तर सबंध देशाचं त्यांनी नेतृत्व केले असते.’

ADVERTISEMENT

‘समस्त मुस्लिम समाजाने आदिलशाही, निजामशही, कुतुबशाही यांनी आपल्या समाजाचे नुकसान केले आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी झटले. आता आपली वेळ आहे. यासाठी प्रयत्न करूया.’

‘जोपर्यंत हिंदू राष्ट्राची जाण असणारे शासन/सरकार सतेत्त येणार नाही तोपर्यंत आपले हिंदू राष्ट्र निर्माण होणार नाही. हे सरकार गोवापासून मुंबई, कोल्हापूरपासून गोंदिया सर्व ठिकाणी दारू दुकाने सुरू करू शकतात. पण आपल्या दुर्गा दौडीला परवानगी नाकारणारे हेच नाकर्ते सरकार आहे.’ असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

Corona म्हणजे थोतांड आहे Sambhaji Bhide यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

याआधी संभाजी भिडेंनी केलेली वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, संभाजी भिडे यांनी पहिल्यांदाच वादग्रस्त वक्तव्य केलेली नाहीत. याआधीही त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनाबाबत बोलताना देखील वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

‘कोरोना गां&%$ प्रवृत्तीच्या लोकांना होणारा रोग’

‘कोरोनाने जी माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. दारुची दुकानं उघडी त्याला परवानगी आणि कुठे काही रस्त्यावर विकतोय त्याला पोलीस काठ्या मारतायेत. काय चावटपणा चाललाय? महानालायकपणा आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही. मी काही राजकीय माणूस नाही. पण माझ्यासारखे असंख्य लोक अस्वस्थ आहेत संबंध देशामध्ये. हा मूर्खपणा चालला आहे. कोरोना हा रोगच नाहीए. हा गां&%$ वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. काही-काही होत नाही.’ असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.

‘Corona म्हणजे थोतांड आहे’

‘कोरोना हे निव्वळ थोतांड आहे. सरकारकडून कोरोना वाढवला जातो आहे. हे देशात चाललेलं षडयंत्र आहे. देशाच्या इस्लामिक स्वारांनी महाराष्ट्राला मातीत घेतली. महाराष्ट्रात भगवंताचे नामकरण वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली कारण वारीमुळे म्हणे कोरोना वाढतो.. हे सगळं थोतांड आहे. मंदिरांचं कुलुप तोडा आणि वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरा.’ असं वक्तव्य संभाजी भिडे यांन केलं होतं.

‘माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली’

‘अहो, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे.’ अशाप्रकारचे वादग्रस्त विधान त्यांनी 2018 साली केलं होतं. ज्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT