History of Air Crashes in India: CDS बिपीन रावतच नव्हे तर 'या' राजकीय नेत्यांनाही विमान अपघातामुळे आपण गमावलंय!

History of Air Crashes in India: भारतात याआधीही अनेकदा विमान अपघातांमुळे काही राजकीय नेत्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर काही जण अपघातातून सुखरुपपणे बचावले देखील. जाणून घेऊया त्याचविषयी.
history of air Crashes india not only cds bipin rawat many politician also lost their lives in air accidents
history of air Crashes india not only cds bipin rawat many politician also lost their lives in air accidents(फाइल फोटो)

History of Air Crashes in India: तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी (08 डिसेंबर) लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. ज्यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नीसह या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. या अपघातात रावत यांच्यासह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, विमान अपघातात एखाद्या मोठ्या व्यक्तीचा बळी जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक बडे राजकारणी विमान अपघातांना बळी पडले आहेत. याआधी विमान अपघातात कोण-कोणत्या बड्या राजकारण्यांना आपला जीव गमवावा लागला हे जाणून घेऊया.

वाय. एस. राजशेखर रेड्डी

आंध्र प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा 2009 साली रुद्रकोंडा हिल येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. रेड्डी हे काँग्रेसमधील सर्वात प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक होते आणि त्यांनी 2009 मध्ये पक्ष पुन्हा सत्तेत येण्यास बरीच मदत केली होती.

माधवराव सिंधिया

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव सिंधिया यांचा सप्टेंबर 2001 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला होता. सिंधिया आणि इतर सहा जणांना घेऊन जाणारे खाजगी विमान यूपीच्या मैनपुरी जिल्ह्याच्या बाहेरील भागात कोसळले होते.

जी एम सी बालयोगी

लोकसभेचे अध्यक्ष असलेले GMC बालयोगी यांचं 03 मार्च 2002 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कैकलूर येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं होतं. बालयोगी यांची 1998 मध्ये लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. 1999 मध्ये ते पुन्हा 13व्या लोकसभेचे अध्यक्ष बनले होते. ते लोकसभेचे पहिले दलित सभापतीही होते.

मोहन कुमारमंगलम

काँग्रेस नेते मोहन कुमारमंगलम यांचा 1973 साली नवी दिल्लीजवळ इंडियन एअरलाइन्सच्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. मोहन हे आधी कम्युनिस्ट पक्षाचे होते पण नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

ओम प्रकाश जिंदल

हरियाणाचे तत्कालीन ऊर्जा मंत्री आणि प्रसिद्ध उद्योगपती ओपी जिंदल यांचं 31 मार्च 2005 रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. जिंदल हे 1996 ते 1997 या काळात अन्न, नागरी पुरवठा आणि सार्वजनिक वितरण समितीचे सदस्य होते.

संजय गांधी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे पुत्र संजय गांधी यांचा जून 1980 साली दिल्लीत विमान अपघातात मृत्यू झाला होता.

डेरा नातुंग

अरुणाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री नातुंग यांचा मे 2001 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. अरुणाचलमध्ये EMRS (एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल) मॉडेल सुरू करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता.

सुरेंद्र नाथ

पंजाबचे राज्यपाल सुरेंद्र नाथ आणि त्यांच्या कुटुंबातील 9 जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. खराब हवामानामुळे सरकारी विमान 09 जुलै 1994 रोजी हिमाचल प्रदेशातील उंच पर्वतांवर कोसळले. त्यावेळी सुरेंद्र नाथ हिमाचलचे कार्यवाहक राज्यपाल होते.

history of air Crashes india not only cds bipin rawat many politician also lost their lives in air accidents
Bipin Rawat: 'जळत्या हेलिकॉप्टरमधून 3 जणांनी उडी घेतली', प्रत्यक्षदर्शीने सांगितलेली नेमकी घटना जशीच्या तशी

असे काही नेते ज्यांनी अपघातांवरही केली मात

  • माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे विशेष विमान नोव्हेंबर 1977 मध्ये आसाममध्ये कोसळले होते. या अपघातातून ते थोडक्यात बचावलेले. अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री पीके थुंगन हे देखील त्यावेळी त्यांच्यासोबत होते.

  • महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील हेलिकॉप्टर एकदा कोसळलं होतं. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नव्हती आणि या अपघातातून ते सुखरुप बाहेर पडले होते.

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कुमारी सेलजा 2004 च्या विमान अपघातातून थोडक्यात बचावले होते. दक्षिण गुजरातमधील खानवेल येथील हेलिपॅडवर उतरत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरचा मागचा भाग तुटला होता.

  • पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि मंत्री प्रताप सिंग बाजवा सप्टेंबर 2006 मध्ये झालेल्या विमान अपघातातून बचावले होते. गुरुदासपूरमध्ये टेक ऑफ केल्यानंतर लगेचच त्यांचे हेलिकॉप्टर विजेच्या तारांना आदळल्याने अपघात झाला होता.

  • पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल 30 ऑगस्ट 2009 रोजी फिरोजपूर येथे त्यांच्या चार्टर्ड हेलिकॉप्टरच्या आपत्कालीन लँडिंगनंतर थोडक्यात बचावले होते.

  • भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह आणि उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी 2010 मध्ये उत्तर प्रदेशातील रामपूर दौऱ्यावर असताना झालेल्या विमान अपघातातून बचावले होते. त्याचे हेलिकॉप्टर कोरड्या गवताच्या ढिगाऱ्याजवळ उतरले आणि त्याला आग लागली होती. पण पायलटने लगेच उड्डाण केले आणि सुरक्षित ठिकाणी उतरवले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in