Hoax Call: 'मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका', बनावट कॉलने उडाला गोंधळ

Mumbai International Airport Police receives a hoax call: मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याच्या एका बनावट कॉलने मुंबई पोलिसांमध्ये अक्षरश: गोंधळ उडवला होता.
Hoax Call: 'मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका', बनावट कॉलने उडाला गोंधळ
Mumbai traffic control receives hoax call about threat to lives of employees working Mumbai International airport(फाइल फोटो)

मुंबई: मुंबईतील वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला (Police Control Room) काल (मंगळवार) आलेल्या एका फोनने एकच गोंधळ उडाला होता. कारण फोन करणाऱ्याने व्यक्तीने ट्रॅफिक पोलिसांना अशी माहिती दिली होती की, मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका (Threat) आहे. अशाप्रकारचा कॉल आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ याबाबत तपास सुरु केला. पण काही वेळानंतर अशी माहिती समोर आली की, हा कॉल बनावट (Hoax Call) होता.

दरम्यान, या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, हा बनावट फोन कॉल लखनौमधून करण्यात आला होता. लखनौमध्येच राहणाऱ्या एका व्यक्तीने हा बनावट कॉल करुन मुंबई पोलिसांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस (Mumbai Police) हे लखनौ पोलिसांच्या संपर्कात असून ते लवकरच आरोपीला मुंबईत घेऊन येतील.

ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांना आलेल्या या कॉलची नेमकी सतत्या तपासण्यासाठी मुंबई पोलिसांनी तात्काळ कॉल ट्रेस केला. त्यावेळी त्यांनी अशी माहिती मिळाली की, हा कॉल लखनौतून करण्यात आला होता. ज्यानंतर मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती लखनौ पोलिसांना दिली. लखनौ पोलिसांनी देखील लागलीच आरोपीची माहिती मिळवली.

दरम्यान, आरोपीने असे कृत्य का केले याबाबतची माहिती मात्र अद्याप समजू शकलेली नाही. जेव्हा आरोपीला मुंबई पोलिसांच्या हवाली केलं जाईल तेव्हाच या कॉल करण्यामागचं नेमकं कारण समोर येऊ शकेल.

6 ऑगस्टलाही आला होता बनावट कॉल

याआधी 6 ऑगस्टला देखील एक असाच बनावट फोन आला होता. या फोनने मुंबईतील पोलीस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली होती. खरं तर या फोन कॉलवर असं सांगण्यात आलं होतं की, मुंबईतील चार ठिकाणी सीएसएमटी, भायखळा स्टेशन, दादर स्टेशन आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत.

कॉलवरुन देण्यात आलेली ही माहिती खरं खळबळजनक असल्याने बॉम्ब निकामी पथक आणि जीआरपी टीमने तात्काळ घटनास्थळी जाऊन नमूद केलेल्या ठिकाणी शोध घेतला. परंतु तपासात हा कॉल बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या CIU (क्राईम इंटेलिजन्स युनिट) ने दोन लोकांना ताब्यात घेतले होते.

Mumbai traffic control receives hoax call about threat to lives of employees working  Mumbai International airport
Pune: मुलाला शाळेत अॅडमिशन मिळत नसल्याने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल‍, पुण्यातून एकाला अटक

वृत्तसंस्था एएनआयने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, या कॉलची चौकशी करणाऱ्या पोलीस पथकाने फोन करणाऱ्याला लखनऊला शोधून काढले आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी लखनौ पोलिसांशी संपर्क साधून आरोपींचा शोध घेतला. पोलिस लवकरच या प्रकरणातील आरोपींना लखनौहून मुंबईत आणू शकतात.

त्याचवेळी, 6 ऑगस्टच्या रात्री एका फोन कॉलमुळे मुंबईतील पोलीस नियंत्रण कक्षात एकच गोंधळ उडाला. खरं तर, फोन कॉल्सद्वारे, मुंबई पोलिसांना धमक्या दिल्या गेल्या की मुंबई, सीएसएमटी, भायखळा स्टेशन, दादर स्टेशन आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानावर बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. बॉम्ब निकामी पथक आणि जीआरपी टीमने घाईघाईने नमूद केलेल्या ठिकाणांचा शोध घेतला. परंतु या सर्व ठिकाणी पोलिसांना काहीही आक्षेपार्ह आढळून आलं नाही. त्यानंतर पोलीस तपासात हा कॉल बनावट असल्याचे निष्पन्न झाले.अखेर या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने दोन लोकांना ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in