Anil Deshmukh: अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तुरुगांत रवानगी की जामीन मिळणार?

Anil Deshmukh 14 days judicial custody: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाने 14 दिवसांची न्यायायलयीन कोठडी सुनावली आहे.
Anil Deshmukh: अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तुरुगांत रवानगी की जामीन मिळणार?
holiday court refuses ED custody sends anil deshmukh 14 days judicial custody parambir singh sachin waze(फाइल फोटो)

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शनिवारी (6 नोव्हेंबर) विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान, ईडीने कोठडीची मागणी केली होती. पण कोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावत त्यांना न्यायालयीन कोठडीत धाडलं आहे. दरम्यान, आता अनिल देशमुख यांची रवानगी तुरुंगात होण्याची शक्यता आहे. पण असं असलं तरीही कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आता अनिल देशमुख हे आपल्या जामीनासाठी अर्ज करु शकतात. त्यामुळे अनिल देशमुखांची रवानगी तुरुंगात होणार की, त्यांना

अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले. देशमुख यांना शनिवारी स्पेशल हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान, ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने त्याला नकार देत देशमुख यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय सुनावला.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने सोमवारी अनिल देशमुख यांना अटक केली होती. चौकशीदरम्यान, अनिल देशमुख यांच्या वतीने कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली नसल्याचे तपास यंत्रणेला आढळून आले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती.

अनिल देशमुखांचा मुलगाही ईडीच्या रडारवर

यापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख याला चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्याला चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, देशमुख यांच्या वकिलाने हृषिकेश देशमुख याच्या वतीनेही अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला ज्यावर कोर्टात 12 नोव्हेंबर 2021 रोजी सुनावणी होणार आहे.

काय प्रकरण आहे?

25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ कार सापडली होती. या प्रकरणात मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझेचे नाव समोर आले होते. यानंतर याप्रकरणी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची महाराष्ट्र सरकारने आयुक्त पदावरुन हटवलं होतं. यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खळबजनक पत्र लिहिलं होतं. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाझे याच्याकडे दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचा दावा परमबीर सिंग यांनी या पत्रात केला होता.

holiday court refuses ED custody sends anil deshmukh 14 days judicial custody parambir singh sachin waze
Anil Deshmukh: 'मी सरळमार्गी आणि नैतिकतेला धरुन चालणारा माणूस..', पाहा अनिल देशमुख काय म्हणाले

ईडीचा अनिल देशमुखांविरोधात असा आरोप आहे की, तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे याने काही हॉटेल मालकांकडून 4.3 कोटी रुपये उकळले होते. जे नंतर त्याने देशमुखांच्या सहाय्यकांना दिले होते. यानंतर दिल्लीस्थित शेल कंपनीच्या माध्यमातून हेच पैसे नागपूरमधील देशमुख आणि कुटुंबाद्वारे चालवल्या जाणार्‍या शैक्षणिक ट्रस्टला देण्यात आले होते.

ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेही टाकले होते. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे याच्यामार्फत देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची वसूलीचे जे आरोप करण्यात आले होते त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ईडीकडून अनिल देशमुख यांना चौकशीसाठी वारंवार समन्स बजावण्यात आलेलं होतं. पण देशमुख ईडीसमोर हजर झाले नव्हते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अशीही चर्चा सुरु होती की, अनिल देशमुख हे देश सोडून पळू तर गेलेले नाही ना? पण 1 नोव्हेंबरला सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख हे अचानक ईडी कार्यालयात आले होते. जिथे 12 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in