औरंगाबाद: 'भावाने तिच्या मुंडक्यासोबत सेल्फी काढला आणि...' किर्तीच्या नवऱ्याने सांगितली थरकाप उडवणारी घटना

Honor Killing Aurangabad: औरंगाबादमधील किर्ती मोटे हत्याकांडाने अवघ्या महाराष्ट्राला हादरवून ठेवलं आहे. दरम्यान, या प्रकरणातील प्रचंड कौर्य हळूहळू आता समोर येऊ लागलं आहे.
औरंगाबाद: 'भावाने तिच्या मुंडक्यासोबत सेल्फी काढला आणि...' किर्तीच्या नवऱ्याने सांगितली थरकाप उडवणारी घटना
honor killing aurangabad brother took selfie with her head and kirti husband recounts shocking incident

इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील किर्ती मोटे हिचं हत्याकांड किती भयंकर आहे हे आता हळूहळू समोर येत आहे. फक्त किर्तीने मनाविरुद्ध लग्न केल्याने तिच्या स्वत:च्या आईने आणि अल्पवयीन भावाने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. पण हे एवढ्यावरच थांबलं नाही. तर त्याचं क्रोर्य अधिकच वाढलं.

किर्तीच्या पतीने 'मुंबई Tak'शी बोलताना किर्तीच्या भावाचं कौर्य कितपत गेलं होतं याबाबतही माहिती दिली. किर्तीची हत्या करुन तिचं मुंडकं तोडल्यानंतर भाऊ तिचं मुंडकं घेऊन बाहेर व्हरंड्यात आला. यावेळी तो एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने मुंडकं हातात घेतलं आणि मोबाइल काढून त्यात बहिणीच्या मुंडक्यासह स्वत:चा सेल्फी काढला.

जाणून घ्या नेमकी काय घटना घडली?

'त्या दिवशी माझी तब्येत खराब होती.. आम्ही दोघं ना वावरात कांदे खुरपत होतो. तर मी तिला म्हटलं की, मी घरी जातो माझी तब्येत काही बरी नाही. मी घरी जाऊन झोपतो.. तुला जोपर्यंत काम करायचंय तोपर्यंत कर.. नंतर घरी निघून ये. मग मी घरी येऊन झोपलो. थोड्या वेळाने मला घरात कुणीतरी आल्यासारखं वाटलं.'

'मी झोपेतच होतो... तर ती म्हणाली की, मम्मी आणि दादा आले. मला असं वाटलं की, त्या दिवशी तिची मम्मी येऊन गेली होती.. म्हटलं सगळं व्यवस्थित होतं.. मला वाटलं प्रेमाने आले असतील. त्यामुळे मला वाटलं गप्पा मारतील, चहा घेतील आणि जातील. काही वेळाने ती चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये गेली ते पण किचनमध्ये गेले.'

honor killing aurangabad brother took selfie with her head and kirti husband recounts shocking incident
किर्ती मोटे हत्याकांड : वडिलांनी किर्तीला घेऊन दिली होती बुलेट, ऑनर किलिंगचा आणखी एक 'सैराट' अँगल समोर

'थोड्या वेळाने मला डब्बे पडल्यासारखा आवाज आला. म्हणून मी बघायला गेलो. मला वाटलं की, ती खुर्चीवरुन वैगरे पडली की काय. मी आत पाहिलं तेव्हा तिच्या मम्मीने तिचे पाय पकडले होते आणि भाऊ कोयत्याने वार करत होता.'

'मी स्वंयपाकघरात पोहचेपर्यंत तिला तोडलंच होतं. तरी पण मी पुढे गेलो. त्याने माझ्यावर कोयता उगारला. त्यामुळे मी पटकन बाहेर आलो. बाहेर आल्यावर मी माझ्या काकीला हाक मारली. माझा आवाज ऐकून काकीही बाहेर आली. तोपर्यंत तिचं मुंडकं घेऊन बाहेर आला व्हरांड्यावर.. त्याने मोबाइल काढून मोबाइलमध्ये सेल्फी घेतली नंतर ते खाली ठेवून दिलं.'

honor killing aurangabad brother took selfie with her head and kirti husband recounts shocking incident
औरंगाबाद: 'माझ्या डोळ्यासमोर भावाने तिचं मुंडकं तोडलं', पतीने सांगितलेला किर्तीच्या हत्येचा घटनाक्रम जसाच्या तसा

'नंतर त्याची आई त्याला म्हणाली की, आतमधून कोयता घेऊन ये. मग तो आत गेला आणि त्याने आत जाऊन कोयता आणला आणि मग ते निघून गेले. या संपूर्ण घटनेनंतर पोलीस तासाभराने आले इथे.' अशी धक्कादायक घटना किर्तीचा पती अविनाश थोरे याने सांगितली आहे.

Related Stories

No stories found.