1 ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्ससारखे ओटीटी, गॅस-लाईट बिलं भरण्याच्या पद्धतीत मोठा बदल

क्रेडिट-डेबिट कार्ड पेमेंटवर आले नवे नियम
1 ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्ससारखे ओटीटी, गॅस-लाईट बिलं भरण्याच्या पद्धतीत मोठा बदल

तुमच्यापैकी बरेच जण नेटफ्किक्ससारखे ओटीटी प्लॅटफॉर्म, लाईट-फोन बिल, गॅस बिल ऑटो पेमेंटने भरत असाल...पण या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. 1 ऑक्टोबर 2021 पासून तुम्हाला ऑटो पेमेंट करता येणार नाहीये. हा बदल नेमका काय आहे? ऑटो पेमेंट नाही तर मग पेमेंटची पद्धत कशी असेल? समजून घेऊयात...

आतापर्यंत तुम्ही नेटफ्लिक्स किंवा लाईट बिलसाठी ऑटो पेमेंट मोड ठेवलेला असेल. म्हणजेच तुम्ही एकदा सगळे तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स टाकलेले असतील, आणि अमूक-अमूक तारखेला हे पैसे आपोआप डिडक्ट होत होते. यासाठी तुम्ही एकदा सगळे डिटेल्स दिल्यानंतर तुम्हाला नंतर कसली भुणभुण नव्हती.

पण आता तसं होणार नाहीये. आता जरी तुम्ही ऑटो पेमेंटचा पर्याय निवडलेला असला तरी पैसे डिडक्ट होण्यापूर्वी तुमची परवानगी घेतली जाईल. पेमेंट तुम्ही आता सुरू असलेल्या कार्डद्वारे करू शकणार आहात. फक्त ते पैसे तुमच्या अकाऊंटमधून कार्डद्वारे कट होण्यापूर्वी तुम्हाला एक मेसेज येईल. ज्यावर तुम्ही Approve म्हणजे हे पेमेंट करण्यासाठी तुमची मान्यता आहे असं सांगितलं कीच ते पेमेंट होईल. जर तुम्ही हे पेमेंट अप्रूव्ह केलं नाही तर मात्र पेमेंट होणार नाही.

1 ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्ससारखे ओटीटी, गॅस-लाईट बिलं भरण्याच्या पद्धतीत मोठा बदल
Nitin Gadkari युट्यूबवरून 4 लाख कसे कमवतात? समजून घ्या

RBI च्या नव्या नियमानुसार ऑटो पेमेंट करण्यासाठीची जी तारीख असेल, सपोज आपण पकडून चालू की तुमचं लाईट बिल दर महिन्याच्या 30 तारखेला ऑटो पेमेंटने होत असेल. तर आता ह्या पेमेंटसाठी तुमची मान्यता घेण्यासाठी 25 तारखेलाच तुम्हाला मेसेज येईल.

जर तुमचं बिल किंवा जे कुठलं पेमेंट असेल ते 5 हजाराच्या वरचं असेल तर तुमच्या मोबाईल किंवा ई-मेलवर एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी टाकून तुम्ही पुढचं पेमेंट करू शकाल.

1 ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्ससारखे ओटीटी, गॅस-लाईट बिलं भरण्याच्या पद्धतीत मोठा बदल
Hindi Din : हिंदी भारताची राष्ट्रभाषा का नाही? समजून घ्या

कोणत्या पेमेंटला फटका बसणार नाही?

ऑटो पेमेंट तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डने करत आहात, त्याच्यासाठीच हे नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत.

तुम्ही होम लोन, वेहिकल लोन किंवा असं कुठलंही बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर त्याच्या EMI वर फरक पडणार नाही, कारण हे पैसे थेट तुमच्या बँक अकाऊंट कट होत असतात.

अशाच प्रकारे तुमच्या इंश्युरन्स किंवा SIP साठी सुद्धा जे पैसे कट होतात, त्यालाही हा नियम लागू नाहीये. कारण या गोष्टीतही तुमचं बँक अकाऊंटच थेट लिंक असल्यामुळे हे पैसे बँकेतून डिडक्ट होतात. त्यामुळे तुमचं कुठलंही कर्ज, विम्याचे हफ्ते, म्युचअल फंडसाठी होणाऱ्या ऑटो पेमेंटवर या नव्या गाईडलाईन्सचा फरक पडणार नाही. ते जसं आता सुरू आहे, तसंच पुढे सुरू राहू शकतं.

आरबीआयच्या या नव्या नियमामुळे बँक तुमच्याकडून कुठलं जास्तीचं शुल्क आकारणार आहे का? तर याचं उत्तरही नाही असं आहे. बँक तुमच्याकडून कुठलं जादाचं शुल्क आकारणार नाही. पण पेमेंटसाठीची जी तुमची परवानगी मागितली जाणार आहे, ती तुम्ही वेळेत ठरलेल्या तारखेला दिली नाहीत, तर मात्र लेट पेमेंट चार्जेस लागू शकतात.

1 ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्ससारखे ओटीटी, गॅस-लाईट बिलं भरण्याच्या पद्धतीत मोठा बदल
Tokyo Olympic 2020 : हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ का नाही? का भारताला एकही राष्ट्रीय खेळ नाही? समजून घ्या

तुम्ही जर क्रेडिट-डेबिट कार्डने पेमेंट करत असाल, तर तुम्हाला आता काय करावं लागेल?

तर तुम्ही ज्या बँकेचं क्रेडिट-डेबिट कार्ड ऑटो पेमेंटसाठी वापरत आहात, त्या बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला चेक करावं लागेल की मर्चंटच्या लिस्टमध्ये ज्याला तुम्हाला पेमेंट करायचंय ते लिस्टेड आहेत का? म्हणजे तुम्हाला नेटफ्लिसला पेमेंट करायचं असेल तर ते तिथे लिस्टेड आहे का हे पाहावं लागेल. जर तसं नसेल तर मग तुम्हाला कार्डने पेमेंट करता येणार नाही. तुम्हाला नेटबँकिंगसारख्या सुविधांनी पेमेंट करावं लागेल.

Related Stories

No stories found.