भारतातल्या चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो कसा आला? त्याआधी काय होतं नोटांवर?

वाचा सविस्तर बातमी, नेमका काय आहे चलनी नोटांचा इतिहास?
How did Mahatma Gandhi's photo appear on Indian currency notes? What happened to the notes before that?
How did Mahatma Gandhi's photo appear on Indian currency notes? What happened to the notes before that?

जवळपास अर्ध शतक झालं असेल आपल्या भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा फोटो छापून येतो आहे. आता कुणी म्हणतंय छत्रपती शिवाजी महाराज, कुणी म्हणतंय बाबासाहेब आंबेडकर तर कुणी म्हणतंय स्वातंत्र्यवीर सावरकर. वाद होतच राहतील, पण भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आला कधी? काय आहे भारतीय नोटेचा इतिहास? समजून घ्या!

Indian Rupee
Indian Rupee Picasa

स्वातंत्र्यानंतर पहिली नोट छापण्यात आली त्यावर महात्मा गांधींचा फोटो नव्हता

स्वातंत्र्यानंतर भारतात पहिली नोट छापण्यात आलेली ती १ रूपयाची नोट होती. १९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा फोटो नव्हता. पण राष्ट्रपिता या नात्याने भारतीय नोटांवरील ब्रिटीश राजाचा म्हणजेच जॉर्ज ६ फोटो हटवून गांधीजींचा फोटो असावा अशी मागणी होती. पण तसं सुरूवातीला तर झालं नाही. स्वातंत्र्यानंतर १९४९ पासून भारतीय नोटांवर ब्रिटीश राजाला हटवून अशोक स्तंभ छापण्यात आला.

2 Rupee Note
2 Rupee Note

१९५३ पासून हिंदी भाषा आली चलनी नोटांवर

हिंदी भाषा या नोटेवर १९५३ पासून prominently आली, आणि नोटेवर रूपयाऐवजी रूपीये असं छापायला सुरूवात झाली. आता तर आपल्याला २ हजाराचीही नोट फारशी पाहायला मिळत नाही, १ हजाराची तर इतिहासजमा झाली, पण १९५४ मध्ये १ हजार, ५ हजार आणि १० हजाराची नोट पहिल्यांदा छापण्यात आली, १ हजाराच्या नोटेवर तंजोर मंदिर होतं, ५ हजाराच्या नोटेवर गेट वे ऑफ इंडिया आणि १० हजाराच्या नोटेवर अशोक स्तंभ होता. आता याच गोष्टी का याचं काही उत्तर नाही, पण अशाच पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी याआधीच्या नोटांवर छापण्यात आल्या होत्या.

10 Rupee Old Note
10 Rupee Old Note

२ रूपयांच्या आणि दहा रूपयांच्या नोटांवर काय होतं?

२ रूपयाच्या नोटेवर आर्यभट्ट, कोणार्क व्हील, मोर याही गोष्टी नोटेवर असायच्या त्याच धर्तीवर २-५ आणि १० हजाराच्या नोटा छापण्यात आलेल्या, पण १९७८ मध्ये ५ हजार आणि १० हजाराच्या नोटा बंद करण्यात आल्या. आता या सगळ्यामध्ये म्हणजे १९५४ मध्ये आपण होतो, जेव्हा मी तुम्हाला ५ आणि १० हजाराच्या नोटांबद्दल बोलले. तर त्यानंतर काही वर्षात म्हणजेच १९६९ मध्ये महात्मा गांधींचा फोटो असलेली १०० रूपयांची नोट छापण्यात आली, ज्यामध्ये सेवाग्राम आश्रमातले महात्मा गांधी दाखवण्यात आले होते.

१९८७ पासून महात्मा गांधी आले नोटांवर

पण भारतीय नोटांवर महात्मा गांधी प्रॉमिनंटली दिसू लागले ते १९८७ पासून. १९८७ मध्ये पहिल्यांदाच ५०० ची नोट छापण्यात आली ज्यावर स्मितहास्य असणारे गांधीजी दिसू लागले. १९८७ पासूनच महात्मा गांधींचा फोटो हा सरसकट सगळ्याच नोटांवर छापायला सुरूवात झाली. फक्त १९९६ मध्ये RBI ने त्यात काही मॉडीफिकेशन्स आणले, जसं की वॉटरमार्क किंवा दृष्टीहीन लोकांसाठी ब्रेल लिपीत नोटेचं मूल्य असणं असे सगळे बदल करण्यात आले,

२००५ मध्ये रंगांच्या छटा बदलल्या

२००६ मध्ये स्टार सिरीज, ज्याच्यामुळे खराब झालेल्या नोटांची पुनर्छपाई होऊ नये याची काळजी घेण्यात आली.

२०११ मध्ये रूपयाचं चिन्हं नोटेवर आलं. २०१५ मध्ये १ रूपयाची नोट नव्याने छापण्यात आली...असे असंख्या बदल झाले पण १९८७ पासून आजतागायत १ गोष्टी कायम राहिली ती म्हणजे भारतीय नोटांवरचे गांधीजी.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in