
मुंबई: कोरोना व्हायरसच्या पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉन हा व्हेरिएंट प्लास्टिक आणि त्वचेवर अधिक काळ टिकतो. एका स्टडीमध्ये ही बाब समोर आली आहे. स्टडीनुसार, Omicron व्हेरिएंट त्वचेवर 21 तासांपेक्षा जास्त आणि प्लॅस्टिकच्या पृष्ठभागावर 8 दिवसांपेक्षा जास्त काळ जगू शकतो. ज्यामुळे कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा ते अधिक वेगाने पसरण्यास मदत होऊ शकते.
जपानमधील क्योटो प्रीफेक्चरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनमधील संशोधकांनी SARS-CoV-2 वुहान स्ट्रेन आणि इतर सर्व प्रकारांच्या (VOCs) व्हेरिएंट्समध्ये पर्यावरणीय स्थिरतेतील फरकांचे विश्लेषण केले आहे.
प्रीप्रिंट रेपॉजिटरी BioRxiv वर अलीकडे पोस्ट केलेल्या पीयर-रिव्ह्यू केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की अल्फा, बीटा, डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंट वुहान स्ट्रेनपेक्षा प्लास्टिक आणि त्वचेच्या पृष्ठभागावर दुप्पट जास्त काळ टिकून राहतं.
स्टडीच्या लेखकांनी सांगितले की, 'या VOCs च्या उच्च पर्यावरणीय स्थिरतेमुळे संपर्क प्रसाराचा धोका वाढू शकतो आणि त्यांच्या प्रसारास हातभार लावू शकतो.'
ते पुढे असंही म्हणाले की, 'अभ्यासातून असे दिसून आले आहे की ओमिक्रॉनमध्ये VOCs मध्ये सर्वाधिक पर्यावरणीय स्थिरता आहे, जे डेल्टा प्रकारात परिवर्तन आणि वेगाने पसरण्यास अनुमती देणारे घटक असू शकतात.'
कोरोनाचे विषाणू इतके तास जिवंत राहतो
प्लास्टिकच्या पृष्ठभागावरील अभ्यासातून असे दिसून आले की मूळ स्ट्रेनचा जगण्याची वेळ 56 तास, अल्फा 191, बीटा 156, गॅमा 59 आणि डेल्टा प्रकार 114 तास आहे. त्या तुलनेत, ओमिक्रॉन प्रकारात सर्वाधिक 193 तास जगू शकतो.
त्याच वेळी, त्वचेच्या पृष्ठभागावर सरासरी व्हायरस जगण्याची वेळ मूळ व्हेरिएंटसाठी 8 तास, अल्फासाठी 19.6 तास, बीटासाठी 19.1 तास, गामासाठी 11 तास, डेल्टासाठी 16.8 आणि ओमिक्रॉनसाठी 21.1 तास एवढं आहे.
संशोधकांच्या मते, अल्फा आणि बीटा व्हेरिएंटमध्ये जिवंत राहण्याच्या वेळेत फारसा फरक नव्हता आणि त्यांच्यात समान स्थिरता होती. जी मागील अभ्यासाच्या परिणामांशी सुसंगत आहे. संशोधकांनी सांगितले की अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि ओमिक्रॉन प्रकारांमध्ये इथेनॉल (सॅनिटायझरमध्ये वापरण्यात येणारे संयुग) प्रतिरोधक क्षमता वाढल्याचे आढळून आले.
तथापि, हे सर्व प्रकार 35 टक्के इथेनॉलच्या संपर्कात आल्यानंतर जास्तीत जास्त 15 सेकंद टिकून राहण्यासच सक्षम आहेत. संशोधकांनी सांगितले की, जगभरातील संक्रमित रूग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता ओमिक्रॉन व्हेरिएंट हा चिंतेचा विषय आहे.