Bulli Bai प्रकरणात तिघांवर कशी झाली कारवाई? कसा लागला छडा? पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनी दिलं उत्तर

जाणून घ्या काय म्हणाले हेमंत नगराळे?
Bulli Bai प्रकरणात तिघांवर कशी झाली कारवाई? कसा लागला छडा? पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनी दिलं उत्तर

Bulli Bai App च्या वादग्रस्त प्रकरणावर आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली. या विरोधात पोलिसांनी कशी कारवाई केली. तिघांना कसं ताब्यात घेतलं? ते देखील त्यांनी सांगितलं. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींची मोडस ऑपरेंडी काय होती हे देखील नगराळे यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले हेमंत नगराळे?

सोशल मीडियावर काही विशिष्ट समाजातील महिलांचे फोटो एका वेबसाईटवर लोड करण्यात आले होते. या विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतील असे मेसेज साईटवरुन प्रसारीत करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या App आणि साईटविरोधात गुन्हा दाखल केला. 31 तारखेला हा App लोड करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली. हा App, तसंच ज्या ट्विटर हॅन्डलवरुन या App ची माहिती दिली जात होती, त्याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली. तपास केला. त्यानंतर ‘Bulli Bai’ नावाचं ट्विटर हॅन्डलही तयार करण्यात आलं होतं, हे देखील तपासात उघड झालं. ही वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, असा उद्देश ठेवून याच नावानं ट्विटर हॅन्डलही सुरु करण्यात आलं होतं असंही त्यांनी सांगितलं.

Bulli Bai प्रकरणात तिघांवर कशी झाली कारवाई? कसा लागला छडा? पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनी दिलं उत्तर
वडिलांना कोरोना, तर आईला कर्करोगामुळे गमावलं; कोण आहे Bulli Bai अ‍ॅपची मास्टरमाइंड श्वेता?

ट्विटर हॅन्डलचे फॉलोअर्स कोण आहेत, त्याची माहिती काढून त्यांच्या मागावर मुंबई पोलीस लागले असता, त्यातून अधिक धागेदोरे हाती लागत गेले. या वादग्रस्त Appप्रकरणी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून दोघांना मुंबईतही आणण्यात आलं आहे. इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेला एक विद्यार्थी या प्रकरणी संशयित आरोपी असून त्याची देखील चौकशी केली जाते आहे. विशाल झा असं या संशयित आरोपीचं नाव असून एका तरुणीलाही याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. उत्तरा सिंह ही तरुणी या प्रकरणी संशियत आरोपी असून तिच्यासह आणखी एकाला उत्तराखंडमधून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

हा वादग्रस्त App एका मोठ्या कटाचा भाग असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यामुळे याप्रकरणी अधिक सखोल चौकशी आणि तपास सुरु असून पोलिसांचं सायबर पथक याप्रकरणी पुढील शोध घेतंय. या वादग्रस्त Appच्या माध्यमातून महिलांच्या भावना दुखावतील असं कृत्य केलं गेल्यानं याप्रकरणातील दोषींविरोधात कठोरातली कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिला.

Bulli Bai प्रकरणात तिघांवर कशी झाली कारवाई? कसा लागला छडा? पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनी दिलं उत्तर
Bulli Bai आणि Sulli deal प्रकरण काय? अ‍ॅपमुळे मुंबईपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण का तापलंय?

काय आहे Bulli Bai अ‍ॅप प्रकरण?

काही दिवसांपासून Sulli deals app चर्चेत आलं होतं. या अ‍ॅपप्रमाणेच आता bulli bai App च्या माध्यमातून मुस्लिम महिलांची बदनामी केली जात आहे. Sulli deals अ‍ॅप GitHub वर लाँच करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे Bulli bai अ‍ॅपही GitHub वर लाँच करण्यात आलं आहे.

Github एक होस्टिंग प्लॅटफॉर्म आहे. प्ले स्टोअरप्रमाणेच या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे अ‍ॅप उपलब्ध आहेत. गिटहब, एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म असून, अ‍ॅप बनवण्यास मदत केली जाते. यासाठी ईमेल आवश्यक असतो.

Bulli Bai अ‍ॅपवरून मुस्लिम महिलांना निशाणा बनवलं जात आहे. एका महिला पत्रकाराने ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. या महिला पत्रकाराचा फोटो या अ‍ॅपवर शेअर करण्यात आला आहे. त्या फोटोवर लोकांकडून अश्लील आणि स्त्री विरोधी प्रतिक्रिया पोस्ट करत आहेत.

Bulli Bai अ‍ॅपवर काय चालतं?

जेव्हा एखादी व्यक्ती हे अ‍ॅप सुरू करते, त्यावेळी त्या व्यक्तीला मुस्लिम महिलांचे फोटो दिसतात. हे फोटो दिसल्यानंतर यूजर्स हे फोटो Bulli Bai Of the Day अशा स्वरुपात पब्लिश करतात. त्यानंतर अश्लील आणि घृणास्पद भाषेत प्रतिक्रिया देत बोली लावली जाते. त्यानंतर #BulliBai हा हॅशटॅग वापरून ट्रेंड केलं जातं.

ट्विटर, फेसबुकसह सोशल मीडियावर प्रभावी असलेल्या 100 महिलांना या अ‍ॅपच्या माध्यमातून निशाणा बनवलं जात आहे. पत्रकारिता आणि इतर क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रभावशाली महिलांचे फोटो आणि नाव वापरून बदनामी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in