Crime: क्षुल्लक कारणावरुन धारदार शस्त्राने हल्ला, भीषण हत्याकांडाने अकोला हादरलं

Akola Murder Case: अकोल्यात अगदी क्षुल्लक कारणावरुन शेजारीच राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Crime: क्षुल्लक कारणावरुन धारदार शस्त्राने हल्ला, भीषण हत्याकांडाने अकोला हादरलं
husband wife brutally killed sharp weapon attack relatives sirso village akola crime

धनंजय साबळे, अकोला

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यातील दर्यापूर मार्गावर असलेल्या ग्राम सिरसो येथे अत्यंत क्षुल्लक कारणावरून शुक्रवारी भीषण हत्याकांड घडले आहे. शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांमध्ये पूर्व-वैमनस्यातून झालेल्या गंभीर हाणामारीत पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

किशोर विठ्ठल गिरी आणि पत्नी दुर्गा किशोर गिरी अशी मृतांची नावे आहेत. सिरसो येथील सिरसो प्लॉट भागात शुक्रवारी शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांमध्ये किरकोळ कारणावरुन भांडणं झाली. त्याचेच पर्यवसन हाणामारीत झालं. यावेळी गिरी कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारार्थ मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यापैकी किशोर गिरी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर इतर गंभीर जखमी असलेल्या दोघांना पुढील उपचारासाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यादरम्यान मृत किशोर गिरी यांच्या पत्नी दुर्गा यांचा अकोल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, या दुहेरी हत्याकांडने तालुका हादरला असून यातील गंभीर जखमी जिजाबाई निरंजन पुरी यांच्यावर अकोल्यात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीसानी घटनास्थळाचा पंचनामा करून रात्री उशिरा 302, 307 व 34 कलमातंर्गत गुन्हा नोंद केला असून आतापर्यंत 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

husband wife brutally killed sharp weapon attack relatives sirso village akola crime
डोंबिवली : संपत्तीच्या वादातून दोन भावांनी केली चुलत भावाची हत्या

दुसरीकडे, या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधाराचा सध्या पोलीसही शोध घेत आहेत. अशी माहिती मूर्तिजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी पांडव यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून जखमी वृद्ध महिलेचा जबाबही नोंदविण्याचा प्रयत्न करत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in