Exclusive: CM ठाकरेंना दिलेल्या पत्राआधी सरनाईकांनी केलेलं मोठं वक्तव्य

Pratap Sarnaik statement: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब समोर येण्याआधीच त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं. जे आता समोर आलं आहे.
प्रताप सरनाईक
प्रताप सरनाईक

ठाणे: शिवसेना (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना बरंच उधाण आलं आहे. मात्र, याच पत्राआधी साधारण 24 तासांपूर्वी प्रताप सरनाईक यांनी एक मोठं विधान केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं होतं की, केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षात माझ्यासारख्या नेत्याचा बळी जात आहे.

पाहूयात 'ते' पत्र समोर येण्यापूर्वी प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले होते:

'बऱ्याच दिवसापासून कर्करोगाशी लढत असलेली माझी पत्नी किंवा हृदयावर झालेल्या दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर आणि इतर कोरोनाच्या सगळ्या व्याधी लक्षात घेता मी सर्वसामान्य जनतेला काही दिवस भेटू शकलो नव्हतो. परंतु विरोधकांनी त्याचं मोठ्या प्रमाणात भांडवल केल्याचं दिसत आहे.'

'गेल्या अनेक वर्षापासून मी आणि माझा परिवार या समाजकारणामध्ये आहे आणि सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणात आम्हाला निवडून देत आहे. एकदा-दोनदा नव्हे तर पाचव्यांदा मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो आहे.'

'यावर्षी महाराष्ट्रात 288 आमदारांपैकी मी 8 व्या क्रमांकावर म्हणजे 84 हजार मताधिक्याने निवडून आलो आहे. परंतु केंद्र आणि राज्याच्या संघर्षात काही लोकप्रतिनिधींचा जो बळी जात आहे त्यामध्ये एक प्रताप सरनाईक आहे.'

'त्यामुळे ईडीचा ससेमिरा मागे आहे. न्यायालयीन प्रक्रिया त्यामध्ये चालू आहे. त्यामुळे जास्त कुठलाही सोशल मीडिया किंवा मीडियाच्या माध्यमातून समोर न जाता आपल्या माध्यमातून लोकांसाठी जेवढ्या जास्तीत जास्त लोकांसाठी काम करता येईल तेवढा माझा प्रयत्न आहे.'

'एक गोष्ट शंभर टक्के की, माझ्या विरोधात विरोधकांनी कितीही षडयंत्र केलं तरीही माझं जे काम आहे, माझ्या कुटुंबीयांचं जे काम आहे ते चालूच राहिल.' असं प्रताप सरनाईक यांनी कालच (19 जून) माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

प्रताप सरनाईक
''लहान तोंडी मोठा घास'' घेत सरनाईकांचा लेटरबॉम्ब, वाचा ५ महत्वाचे मुद्दे

दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रात देखील असा दावा केला आहे की, फक्त राज्यात शिवसेना भाजपसोबत नसल्याने शिवसेनेतील नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यांच्यामागे केंद्रीय यंत्रणांना लावलं जात आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी भाजपशी पुन्हा युती करावी असं आवाहन सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं आहे.

प्रताप सरनाईक
Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं 'ते' खळबळजनक पत्र जसंच्या तसं...

अर्णब गोस्वामी, कंगना रणौत प्रकरणी सरनाईकांनी थेट विधानभवनात शिवसेनेची बाजू मांडत दोघांवरही टीका केली होती. परंतु यानंतर सरनाईक ईडीच्या रडावर आले आणि त्यांच्या मालमत्तांवर छापे घालण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून सरनाईक आणि त्यांच्या मुलांची चौकशी सुरु आहे. परंतु या काळात कोणत्याही नेत्यांचं किंवा राज्य सरकारचं सहकार्य मिळालं नसल्याची खंत सरनाईकांनी पत्रात बोलून दाखवली आहे.

"युद्धात लढत असताना अभिमन्यूसारखं लढण्यापेक्षा आणि कर्णासारखं बलिदान देण्यापेक्षा अर्जुनासारखं लढावं असं मला वाटतं. राज्यात आपली सत्ता असतानाही राज्य शासनाचे किंवा इतर कोणत्याही अन्य नेत्याचे सहकार्य मिळाले नसताना कुठलाही त्रास न देता मी माझी कायदेशीर लढाई माझ्या कुटुंबासोबत ७ महिने लढतो आहे", असं म्हणत सरनाईकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in