Cruise Drugs Party: कासिफ खानने मला क्रूझ पार्टीचं आमंत्रण दिलं होतं, पण...: अस्लम शेख यांचा खळबळजनक खुलासा

Minister Aslam Shaikh: मंत्री अस्लम शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन काही खळबळजनक खुलासे केले आहेत.
Cruise Drugs Party: कासिफ खानने मला क्रूझ पार्टीचं आमंत्रण दिलं होतं, पण...: अस्लम शेख यांचा खळबळजनक खुलासा
i dont know who this Kashif khan is as a guardian minister i was invited cruise party said minister aslam shaikh

मुंबई: 'क्रूझ ड्रग्स प्रकरण हे एक मोठं षडयंत्र होतं. याच क्रूझ ड्रग्स प्रकरणात महाविकास अडकवण्याचा मोठा प्लॅन होता. याच पार्टीला मंत्री अस्लम शेख यांनाही कासिफ खानने निमंत्रित केलं होतं.' असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी काल (7 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत केला होता. मलिकांच्या याच दाव्याला आता कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी देखील दुजोरा दिला आहे. 'कासिफ खान याने मला क्रूझ पार्टीसाठी बोलावलं होतं. पण मी त्याला ओळखत नाही आणि मी त्या पार्टीला गेलो देखील नव्हतो.' अशी माहिती अस्लम शेख यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली आहे.

आर्यन खानच्या अटकेनंतर नवाब मलिक हे याप्रकरणी दररोज एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर नवनवे आरोप करत आहेत. त्यांच्या मते, ही कारवाई पूर्णपणे रचलेला एक कट होता. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी एक डाव टाकण्यात आला होता. ज्यामध्ये अनेक मंत्र्यांनां अडकून सरकारचं नाव खराब करण्याचा हा प्रयत्न होता. असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.

नवाब मलिक यांच्या याच दाव्यानंतर सोमवारी (8 नोव्हेंबर) मंत्री अस्लम शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी काही खुलासे केले आहेत.

'...तेव्हापासून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं काम हे भाजपकडून सुरु'

'ज्या दिवशी शपथविधी पार पडला तेव्हापासून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं काम हे भाजपकडून सुरु झालं आहे. तेव्हापासून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे देखील प्रयत्न सुरु आहेत. आता शाहरुख खानच्या मुलाच्या केससंबंधी ज्या काही गोष्टी समोर आल्या आहेत त्या नवाब मलिक यांनी सर्व पुराव्यानिशी तुमच्या समोर ठेवल्या आहेत.' असं अस्लम शेख म्हणाले.

'कासिफ खानला मी ओळखत नाही, पण त्याने मला पार्टीला आमंत्रित केलं होतं'

'काल नवाब मलिक यांनी असं सांगितलं की, मला देखील त्या पार्टीत बोलवण्यात आलं होतं. मला कासिफ नावाचा जो माणूस आहे ज्याला मी काही ओळखत नाही. याआधीही मी त्याला भेटलेलो नाही. त्याने मला या पार्टीला आमंत्रित केलं होतं. आता मुंबई शहराचा मी पालकमंत्री आहे. अशावेळी मला अनेक आमंत्रणं येत असतात. त्याच पद्धतीने सर्व निमंत्रणांमध्ये हे देखील एक निमंत्रण होतं.' असा खुलासा मंत्री शेख यांनी केला.

'पण आता ज्या गोष्टी बाहेर येत आहेत त्यानुसार यात काही षडयंत्र होतं की नाही याबाबत मला आता तरी काही माहिती नाही. पण आता याबाबत दोन-दोन एजन्सी तपास करत आहेत.' असंही ते म्हणाले.

'दिवसभरात मला 50 जणांकडून आमंत्रणं येतात'

'दिवसभरात मला 50 लोकं आमंत्रित करतात. एखाद्या लग्नात जरी गेलो तरी तिथेही वेगवेगळ्या कार्यक्रमाची निमंत्रणं मिळत असतात. त्यामुळे जिथे मला जायचं असतं तेथील नंबर आणि डिटेल्स मी घेत असतो. जिथे मला जायचंच नाहीए त्याबाबत त्या व्यक्तीचा नंबर घेणं किंवा त्याची माहिती घेणं हे मला काही उचित वाटत नाही.' अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.

'कासिफकडे माझा मोबाइल नंबर आहे की नाही हे मला माहित नाही'

'कासिफकडे माझा मोबाइल नंबर आहे की नाही हे मला माहित नाही. कारण माझा मोबाइल हा जास्तीत जास्त वेळ हा माझ्या पीएकडेच असतो. कासिफने मला बोलावलं होतं. एका ठिकाणी भेटल्यावर. त्याने आमंत्रण केलं होतं. त्या ठिकाणी तो कसा आला ते मला माहित नाही.'

'पण जसे सगळे लोकं मला आमंत्रित करतात कुठेही गेल्यानंतर त्यातलाच तो एक भाग आहे. पण आता यामागे नेमकं काय षडयंत्र होतं हे दोन-दोन एजन्सी आता तपासतील.' असं म्हणत अस्लम शेख यांनी आपल्याला या प्रकरणी फार काही माहित नसल्याचं सांगितलं आहे.

i dont know who this Kashif khan is as a guardian minister i was invited cruise party said minister aslam shaikh
‘उडता पंजाब’ नंतर ‘उडता महाराष्ट्र’ करण्याचा कट होता; नवाब मलिक यांचा आरोप

'गुजरातमध्ये 30 हजार कोटींहून अधिकच्या किंमतीचं ड्रग्स पकडलं, त्याविषयी काहीच चर्चा नाही'

'सुरुवातीला असं वाटत होतं की, ही ड्रग्सची केस आहे. जेव्हा शाहरुखच्या मुलाचं नावं आलं तेव्हा जगभरातील मीडियाने त्याला कव्हर करणं सुरु केलं. मला याबाबत अतिशय वाईट वाटतंय की, दुसरीकडे गुजरातमध्ये 30 हजार कोटींहून अधिक किंमतीचं ड्रग्स पकडलं गेलं त्यावर काहीही चर्चा झाली नाही.' असंही अस्लम शेख म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in