'मला वाटत नाही की महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत' वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांचं वक्तव्य

जाणून घ्या काय म्हणाले रणजीत सावरकर?
'मला वाटत नाही की महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत' वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांचं वक्तव्य

देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून देशाच्या राजकीय वर्तुळात एक नवी चर्चा सुरू झाली आहे. त्यांचं एक वाक्य खूप चर्चेत आहे. राजनाथ सिंह असं म्हणाले की, 'महात्मा गांधी यांच्या सल्ल्यावरूनच वीर सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती.' यावरून वाद सुरू असताना आता या सगळ्या वादावर वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

राजनाथ सिंह यांनी जे वक्तव्य केलं त्यावर टीका करताना MIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही टीका केली. 'हे लोक (भाजप) चुकीचा इतिहास सादर करत आहेत, हे जर असंच चालत राहिलं तर महात्मा गांधींना हटवून हे लोक वीर सावरकरांना राष्ट्रपिता जाहीर करतील. ज्या वीर सावरकरांवर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप होता त्यांनाच अशा प्रकारे राष्ट्रपिता घोषित केलं जाईल' असं ओवेसी म्हणाले आहेत. मात्र आता याबाबत रणजीत सावरकर यांनी अगदीच रोखठोक भूमिका मांडली आहे.

mahatma gandhi asked veer savarkar to file mercy plea to british defence minister rajnath singh claim book launch
mahatma gandhi asked veer savarkar to file mercy plea to british defence minister rajnath singh claim book launch

रणजीत सावरकर काय म्हणाले?

भारतासारखा देशाला एक राष्ट्रपिता असू शकत नाही. देशाच्या निर्मितीसाठी हातभार लावणारे हजारो लोक असतील, जे आता विस्मृतीत गेले असतील. या देशाला पाच हजार वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास आहे. त्यामुळ एक कुठलीही व्यक्ती देशाची राष्ट्रपिता होऊ शकत नाही. मला असं वाटत नाही की महात्मा गांधी राष्ट्रपिता आहे. मला राष्ट्रपिता ही संकल्पनाच मान्य नाही. आपला देश 40-50 वर्षे जुना नाही. आपल्या देशाला पाच हजार वर्षांची संस्कृती आहे. मला राष्ट्रपिता ही संकल्पनाच मान्य नाही. त्यामुळे सावरकरांना राष्ट्रपिता करण्याचा मुद्दाच उपस्थित नाही असंही रणजीत सावरकर यांनी म्हटलं आहे.' ANI ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे रोखठोक भाष्य केलं.

राजनाथ सिंह नेमकं काय म्हणाले:

'सावरकरांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे सातत्याने सांगितले जाते. पण सावरकरांनी सुटकेसाठी याचिका दाखल केल्या नाहीत. पण साधारणपणे कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दया याचिका दाखल करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते. गांधीजींच्या या सूचनेनंतरच त्यांनी दया याचिका दाखल केली होती. त्यावेळी महात्मा गांधींनी सावरकरांना ब्रिटिशांना सोडून द्यावं असं आवाहनही केलं होतं. तेव्हा गांधीजींनी असंही म्हटलं होतं की, ज्याप्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत तशाच पद्धतीने सावरकर देखील स्वातंत्र्य चळवळ सुरु ठेवतील. पण त्यांना असं बदनाम केलं जातं की, सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती, क्षमायाचना केलेली किंवा आपल्या सुटकेची मागणी केली होती.'

सावरकरांचे हिंदुत्व वेगळे आहे: राजनाथ सिंह

त्याचवेळी सावरकरांना जातीयवादी असं म्हणणाऱ्यांना देखील राजनाथ सिंह यांनी सुनावलं आहे. 'सावरकरांचे हिंदूत्व हे धर्माच्याही वर होते. त्यांनी कोणाशीही भेदभाव केला नाही. याबाबत ते म्हणाले की, सावरकरांना नेहमीच असं वाटायचं की, धर्माच्या आधारावर फूट पडू नये. ते नेहमी अखंड भारताबद्दल बोलत असत. त्यांचे हिंदुत्व समजून घेण्यासाठी खोल समज आवश्यक आहे.'

'मला वाटत नाही की महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत' वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांचं वक्तव्य
Savarkar: सावरकर हे मुस्लिमांचे शत्रू नव्हते, त्यांनी तर...: मोहन भागवत

काय म्हणाले मोहन भागवत?

दरम्यान, याच कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत हे देखील उपस्थित होते. त्यांनीही सावरकरांच्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, 'सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते. त्यांनी उर्दू भाषेत अनेक गझल लिहिल्या होत्या. त्याचवेळी भागवत यांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तानात जाणाऱ्या मुस्लिमांविषयी सावरकरांनी विचार मांडले होते.' असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.