के.पी. गोसावींनी केलेल्या सगळ्या आरोपांचे माझ्याकडे पुरावे-प्रभाकर साईल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

के. पी. गोसावी यांनी माझ्या विरोधात केलेल्या आरोपांबाबत माझ्याकडे सगळे पुरावे आहेत असं आता प्रभाकर साईल यांनी आता म्हटलं आहे. मला बदनाम करण्याचा डाव आता सुरू आहे कारण के. पी. गोसावी आणि इतर लोकांचे सगळ्या गोष्टी मी समोर आणल्या त्यामुळे मला बदनाम केलं जातं आहे असंही साईल यांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रभाकर साईल यांनी हे वक्तव्य केलं आहे. प्रभाकर साईल यांनी मीडिया समोर आल्यानंतर जे आरोप केले होते ते के. पी. गोसावी यांनी खोडले होते. आता त्यानंतर आज पुन्हा एकदा प्रभाकर साईल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

मी कोणत्याही दबावाखाली किंवा पैशांसाठी हे वक्तव्य करत नसल्याचंही प्रभाकर साईल यांनी म्हटलं आहे. तसंच आज संध्याकाळी सहा वाजता सविस्तर भूमिका मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. प्रभाकर साईल यांनी सहार पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. एवढंच नाही तर मी पैशांसाठी काहीही करत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

माझे कोणत्याही नेत्याशी काहीही संबंध नाहीत. मी फक्त माझ्या कामाशी प्रामाणिक राहणारा माणूस आहे. मला नाहक बदनाम केलं जातं आहे असंही प्रभाकरने म्हटलं आहे. तसंच मी आज संध्याकाळी सहा वाजता तुमच्या सगळ्यांशी सविस्तर बोलणार आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे असंही प्रभाकरने म्हटलं आहे. मी 22 जुलैला के. पी. गोसावी यांच्याकडे कामाला लागलो. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी मला 18 हजार रूपये दिले आहेत. पाच हजार रूपये माझ्या मुलीच्या वाढदिवसाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहा हजार आणि माझ्या पत्नीचा वाढदिवस असताना तिच्या अकाऊंटला गिफ्ट म्हणून दिलेले तीन हजार असे अठरा हजार रूपये त्यांनी मला आत्तापर्यंत दिले आहेत. बाकी माझी सॅलरीही पूर्ण दिलेली नाही असंही साईल यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे के. पी. गोसावी यांच्या बॉडीगार्डने?

ADVERTISEMENT

किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर याने आज तक सोबत एक्सक्लुझिव्ह चर्चा केली आहे. यामध्ये प्रभाकर याने एका नोटरीकृत प्रतिज्ञापत्राचा उल्लेख केला आहे. कोऱ्या प्रतिज्ञापत्रावर माझ्या सह्या घेण्यात आल्या असं प्रभाकरने म्हटलं आहे. प्रभाकर हा देखील या प्रकरणात साक्षीदार आहे. त्याला साक्षीदार क्रमांक एक असं म्हटलं आहे. आपल्याला तिथे काय होणार आहे हे कळलं नव्हतं. पंचनाम्याचे कागद आहेत असं सांगून माझ्या सह्या घेण्यात आल्या आहेत असं प्रभाकरने सांगितलं होतं

ADVERTISEMENT

समीर वानखेडेपासून जिवाचा धोका?

या प्रकरणात मला समीर वानखेडेंपासून जिवाचा धोका आहे असाही दावा प्रभाकर याने केला आहे. क्रूझवर छापा करण्याच्यावेळी मी आणि गोसावीसर सोबत होतो. समीर वानखेडे तिथे बसलेले होते. मी त्यांना फ्रँकी आणि पाण्याची बाटली दिली. मला के. पी. गोसावी यांनी असं सांगितलं थोडावेळा बाहेर जा मी तुला व्हॉट्स अप काही फोटो पाठवतो. त्या फोटोतल्या लोकांना ओळख असं सांगितलं. मला ते फोटो लगेच आले नाहीत. साधारण दीड वाजण्याच्या सुमारास आले. त्यातला पहिला फोटो हा मुनमुन धमेचाचा होता. के.पी. गोसावी त्या दिवसापासून मला भेटलेले नाहीत. त्यांना समीर वानखेडेंपासून जिवाचा धोका आहे असंही प्रभाकरने म्हटलं होतं.

एवढंच नाही तर आर्यन खानची सुटका करण्यासाठी 25 कोटींची खंडणी मागितली होती. असाही गंभीर आरोप प्रभाकरने केला. जो एनसीबीने आणि के. पी. गोसावी यांनी फेटाळला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT