'शरद पवार यांना पंतप्रधान आणि अजित पवारांना मुख्यमंत्रपदी बसलेलं बघायचं आहे'

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचं पिंपरीत वक्तव्य
'शरद पवार यांना पंतप्रधान आणि अजित पवारांना मुख्यमंत्रपदी बसलेलं बघायचं आहे'

शरद पवार यांना देशाचे पंतप्रधान आणि अजित पवार यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात ही भावना आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यावेळी शरद पवार हे देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरतील आणि राष्ट्रपती होण्यासाठी जे आवश्यक आहे ते करतील अशी चर्चा सुरू झाली होती. तसंच याआधी अनेकदा ते पंतप्रधान होतील का याच्याही चर्चा रंगल्या आहेत. महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळी अजित पवार मुख्यमंत्री होतील का? अशीही चर्चा होती. आता अमोल कोल्हे यांनी त्यांच्या मनातला विचार बोलून दाखवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना सुरूवात झाली आहे.

शरद पवार
शरद पवार

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासमोर बोलत असताना अमोल कोल्हे यांनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या. तसंच यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सगळ्यांना आपल्या मनातील इच्छेसाठी ताकद उभी करण्याचंही आवाहन केलं आहे.

अजित पवार
अजित पवार

आणखी काय म्हणाले अमोल कोल्हे?

शिरूरमधल्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी मी दोन पावलं बाजूला उभं राहून मी अजितदादांना पाहात होतो. दादांनी पिंपरी चिंचवड शहराच्या बाबतीत अनेकदा अनेक गोष्टी दिल्या आहेत. आता ऋणातून उतराई होण्याची वेळ असते. मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचं आहे, ही भावना असेल तर प्रत्येक कार्यकर्त्यानं दादांच्या पाठिशी उभं राहणं आवश्यक आहे.

एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात ही भावना आहे की शरद पवार पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष घालत आहेत, अजितदादा लक्ष घालत आहेत ही भाग्याची गोष्ट आहे. पण एक कार्यकर्ता म्हणून मला माझ्या नेत्याला देशाच्या पंतप्रधानपदी बसलेलं पाहायचं असेल, तर माझ्या सर्वोच्च नेत्यानं एका शहराच्या महापालिकेमध्ये लक्ष घालायला लागू नये अशी कार्यकर्त्यांनी फळी आपण त्यांना दाखवून दिली पाहिजे असंही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं

Related Stories

No stories found.