देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी पाहून मला धक्काच बसला होता-शरद पवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राच्या राजकारणात नोव्हेंबर 2019 मध्ये जे घडलं ते इतक्यात कुणीही विसरण्यासारखं नाही. पुढची अनेक वर्षे ते लक्षात राहणार आहे. बरोबर आम्ही सांगत आहोत ते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत. फक्त 72 तासांचं हे सरकार होतं. अनेकांना आश्चर्याचा धक्काच त्यामुळे बसला होता. मुंबई तकने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारला. पहाटेचा शपथविधी पाहून ज्यांना धक्का बसला त्यामध्ये इतर अनेकांप्रमाणेच शरद पवारही होते. शरद पवारांनी महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण, महाविकास आघाडी, पुलोदचं सरकार याबाबत मुंबई तकला सविस्तर मुलाखत दिली आहे.

पहाटेच्या शपथविधीबाबत काय म्हणाले शरद पवार?

शिवसेना आणि भाजप यांच्यात अंतर आहे हे आम्हाला दिसत होतं. एकीकडे शिवसेनेशी आणि काँग्रेसशी एकत्र येण्याबाबत बोलणी सुरू होती. त्यावेळीच एक निरोप आला होता की भाजपही सोबत येण्यास तयार आहे. जवळपास दीड महिना झाल्यानंतरही सरकार बनत नाही हे पाहून अनेक आमदार निराश झाले होते. आम्हाला काही जण सांगत होते काही करून सरकार स्थापन करा. भाजपही तयार आहे त्याचा विचार करा असं काही जणांनी सुचवलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मात्र भाजपला दूर ठेवायचं असल्याने आम्ही हा विचार मानला नाही. अजित पवार त्यावेळी एक बैठक झाली त्यामध्ये वैतागले होते. तुम्ही म्हणता तसं असं अजित पवार म्हणाले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला. पहाटे जो शपथविधी झाला त्याबद्दल आम्हाला कुणालाच काहीही माहित नव्हतं. मी सुद्धा झोपेतच होतो, मला उठवलं आणि सांगितलं गेलं जे ऐकून मला धक्काच बसला.

ADVERTISEMENT

मी म्हटलं हे एक आव्हान आहे. आता महाराष्ट्रात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मी सगळ्या आमदारांना फोन केले आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक बोलावली. त्यावेळी मला अजित पवार भेटलेच नाहीत. मात्र 98 टक्के आमदारांना बोलवण्यात आम्ही यशस्वी झालो. अजित पवारांच्या सोबत भाजपला पाठिंबा देण्यासाठी जे आमदार गेले होते तेदेखील आले. जवळपास दोन तासात राष्ट्रवादीचे 98 टक्के आमदार हजर झाले.

ADVERTISEMENT

अजित पवारांच्या सोबत जे आमदार गेले होते त्यांचं असं म्हणणं होतं की भाजपसोबत जायला तुमची संमती आहे. आम्ही ते समजूनच गेलो होतो, पण तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे असंही राष्ट्रवादीच्या त्या आमदारांनी मला सांगितलं. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलेलं सरकार अवघ्या 72 तासांमध्ये कोसळलं. जे काही घडलं आपल्या हातून ते योग्य नाही हे अजित पवारांनाही लक्षात आलं. अजित पवार मला भेटायला घरी आले. ते म्हणू लागले मी आता राजकारण सोडून देतो आणि घरी जाऊन बसतो, शेती करतो असं सांगू लागले.

आजची काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी- शरद पवारांचं परखड भाष्य

मी अजित पवारांना म्हटलं की ठीक आहे कधी कधी माणूस उलटसुलट निर्णय घेतो. मात्र आपल्या लक्षात आल्यानंतर तो निर्णय दुरूस्त करायची तयारी असेल तर सोडून द्यायचं असतं की काय निर्णय घेतला होता. एकदिलानं काम सुरू करायचं असतं. हे झाल्यानंतर मग अजित पवारही सोबत आले. ते महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले.

मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं हे स्वतःच सांगितलं आहे. शरद पवारांनी ही प्रदीर्घ मुलाखत इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई आणि सिनीयर एक्झिक्युटिव्ह एडिटर साहिल जोशी यांना दिली आहे. यामध्ये त्यांनी विविध विषयांवर मोकळेपणाने भाष्य केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT