मी उद्धव ठाकरेंना भेटणार, त्यानंतर ते राऊतला चपलेने मारतील: राणे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Narayan Rane Harshly Criticized to Sanjay Raut: मुंबई: शिवसेना (ShivSena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे (BJP) मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. संजय राऊतांनी काल (6 जानेवारी) केलेल्या विखारी टीकेनंतर आता नारायण राणेंनी देखील मुंबईत पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. (i will meet uddhav thackeray then he will hit sanjay raut with a shoe said narayan rane)

यावेळी नारायण राणे यांनी थेट म्हटलं की, ‘मी एकदा उद्धव ठाकरेंना भेटणार असून संजय राऊतने मला जे उद्धव आणि रश्मी ठाकरेबद्दल सांगितलं ते त्यांना समजलं तर ते संजय राऊतला चपलेने मारतील.’ असं म्हणत नारायण राणेंनी देखील संजय राऊतांवर टीका केली आहे.

पाहा नारायण राणे नेमकं काय म्हणाले..

‘शिवसेनेच्या पहिल्या 19 जून 1966 पासूनच्या पहिल्या 39 वर्षात शिवसेना वाढविण्यासाठी आणि सर्व काही करण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली. संजय राऊतने घेतलेली आहे. आज त्याला जो आनंद होतोय ना हा शिवसेना संपवण्याचा आनंद आहे.56 आमदार होते आता 12 पण नाही राहिले.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘कोणाला तो चँलेज देतोय. एक तरी संजय राऊतचं सामाजिक, विधायक, धार्मिक काम आहे का?.. सांगा.. संपादक म्हणून बोध देईल, विकासात्मक लिहलेला लेख दाखवा. पत्रकार म्हणून काही पावित्र्य असतं, आचारसंहिता असते.’

‘राणे तुला पूर्ण नागडा करीन…’, राऊतांच्या संयमाचा स्फोट; काय घडलं?

ADVERTISEMENT

‘मला प्रोटेक्शन मी मागितलेलं नाही. 90 सालापासून आहे. मी ज्यांच्याबरोबर शिवसेनेत असताना लढलो त्यात देशातले नाही बाहेरचे लोक होते. पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी 90 साली जबरदस्ती पुरवली सुरक्षा. त्याला माहीत नाही. तो शिवसेनेत नव्हता.’

ADVERTISEMENT

‘शिवसेनेविरुद्ध तो लोकप्रभामध्ये लेख लिहित होता. तुम्हाला आज सांगतो… संजय राऊत तू जिथे बोलशील तिथे यायला तयार आहे. सुरक्षा मी इथेच सोडतो.’

‘हे राज्य शिवकल्याणकारी राज्य व्हावं या राज्यात येणारा उद्योगपती असो, नागरिक असो.. या जनतेला सुखी-समाधानी करण्यासाठी आमचं सरकार एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे काम करत आहेत.’

‘शिवसेनेचे आताचे नेते उद्धव ठाकरे असो, संजय राऊत.. कोणीही असो. काय लोकांच्या हिताचं बोलतात? अडीच वर्षात केलेलं काम त्यांनी सांगावं. कोणत्या क्षेत्रात काम केलं.. किती त्या राज्याचा जीडीपी वाढवला. दरडोई उत्पन्न वाढवलं.’

‘मला कळत नाही.. काय तुम्ही त्याला दाखवता. आजच्या राजकारणात हा जोकर आहे. जोकर.. त्याच्याकडे काहीही बौद्धिकही नाही.’

‘मी केंद्रीय मंत्री आहे.. मला काम आहे. माझा अंतर्गत 6 कोटी 30 लाख उद्योजक आहेत. मी अख्ख्या राज्यात फिरतो आणि उद्योग-रोजगार वाढवायचं काम करतो. हा उद्योग संजय राऊतला नाही.’

‘…आणि मग मी दाखवतो’, संतापलेल्या संजय राऊतांचं नारायण राणेंना चॅलेंज

‘एक गोष्ट तुम्हाला सांगतो.. एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार.. कशासाठी माहितीए ना.. मी खासदार झाल्यावर संजय राऊत राज्यसभेत माझ्या बाजूला येऊन बसायचा आणि उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेबद्दल जे काही सांगायचा ना. ते मी उद्धव ठाकरेला आता भेटून सांगणार. चपलेने नाय मारला ना उद्धव आणि रश्मीने तर मला विचारा..’

‘हा शिवसेना वाढवणारा नाही तर संपवणारा आहे. हा मातोश्रीला सुरुंग लावणारा आहे. तो ज्याच्या अंगावर हात टाकेल.. खांद्यावर.. तो खांदा गळलाच समजा. असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे मला परत संजय राऊतबद्दल विचारु नका.’

‘एक ना एक दिवस संरक्षण सोडून मी संजय राऊतच्या समोर जाणार. माझा इतिहास आहे ना.. शिवसेना घडवण्यामध्ये आहे. शिवसेना संपवण्यामध्ये नाहीए. माझ्या वाटेला येऊ नको.. तू सांगशील आज.. ये.’

‘हे सगळं सोडा.. राज्याच्या विकासबद्दल बोला. गरीबांना आम्ही मोफत धान्य देतो. हे पवित्र काम मोदीच करु शकतात. शिवसेनेला हा शब्द जड जाईल. जिभेवर येणार नाही.. गरीब आणि मदत.. किती शिवसैनिकांचे, बाळासाहेबांनंतर संसार या शिवसेनेने उभारले? की, उध्वस्त केले… ते आम्हाला सांगा.’ अशी जोरदार टीका नारायण राणेंनी केली आहे. त्यामुळे आता संजय राऊत याबाबत नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT