'आता मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही', नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा

'आता मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही', नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा

जाणून घ्या काय म्हणाले नाना पटोले?

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधीच्या भावना मांडलेल्या होत्या. महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांच्या भावना मांडल्या होत्या आणि त्या आधारे तीन सदस्यीय प्रभाग सदस्य करावे असं सरकारला कळवलं होतं. आता सरकारने जे निर्णय घेतलेला आहे, त्याला आम्ही लोकशाही पद्धतीने लोकांसमोर जाऊन विरोध करू. आता एकदा सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी त्याविषयावर बोलणार नाही. सरकार आणि संघटन वेगवेगळं असतं. आम्ही संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करू असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

'आता मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही', नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
Sharad Pawar हेच महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल-नाना पटोले

महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता इतर सगळ्या महापालिकांमध्ये तीन प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात बदल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसने केली होती. ज्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिमंडळ बैठकीत फेरविचार केला जाईल असे संकेत दिले होते. मात्र महापालिकांच्या प्रभाग पद्धतीत कोणतेही बदल होणार नाहीत. यावर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर माध्यमांसी बोलत असताना आता लोकशाही पद्धतीने उत्तर देऊ या विषयावर पुन्हा मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही असं म्हटलं आहे.

'आमचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे जे काही रिपोर्ट देतील त्याप्रमाणे आशिष देशमुख प्रकरणात योग्य कारवाई केली जाईल. मात्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आशिष देशमुख यांच्या वक्तव्यात संदर्भात काही माहिती समोर आली आहे. आता प्रभारींच्या अहवालानंतर निर्णय होईल.

'आता मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही', नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
तीन प्रभाग पद्धतीविरोधात काँग्रेसचा ठराव : नाना पटोलेंनी भूमिका केली स्पष्ट

आज रामटेकमध्ये शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांनी काँग्रेसबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. काँग्रेस पक्ष मेला होता उद्धव ठाकरे यांनी सत्तेची संधी दिल्यामुळे हे दोन्ही काँग्रेस पक्ष जिवंत झाले असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याबाबत विचारलं असता नाना पटोले यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

विदर्भात सर्वत्र फिरताना परिस्थिती पाहिली आहे.. मराठवाड्याची माहिती घेतली आहे.. सोयाबीन आणि कापूसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे... निर्माण झालेली परिस्थिती ओला दुष्काळ झाल्याकडे संकेत देत आहेत... सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मदत करावी ही काँग्रेसची मागणी आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in