
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थातच UPSC च्या परीक्षेचा आज निर्णय जाहीर झाला. देशभरातून ७६१ उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून बिहारच्या शुभम कुमारने भारतामधून पहिला येण्याचा मान पटकावला आहे. या परीक्षेत महत्वाचा निकाल म्हणजे २०१५ सालच्या परीक्षेत देशातून पहिली येण्याचा मान मिळवणाऱ्या IAS टॉपर टीना डाबी यांची बहिणी रिया डाबीने यंदाच्या परीक्षेत देशातून १५ वी येण्याचा मान मिळवला आहे.
टीना डाबी यांनी सोशल मीडियावरुन आपल्या बहिणीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
देशात पहिला आलेला शुभम कुमार हा बिहारच्या कटीहारचा राहणारा आहे. त्याने IIT Mumbai मधून सिवील इंजिनीअरिंग केलं आहे. शुभमने तिसऱ्या प्रयत्नात देशात अव्वल क्रमांक मिळवला आहे. शुभमने २०१८ साली परीक्षा दिली होती. २०१९ साली त्याने युपीएससीची परीक्षा दिली त्यावेळी तो देशातून २९० वा आला होता.