'बाळासाहेब आज जिवंत असते तर थोबाडीत मारली असती', चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका

'काल दुकानं फोडणाऱ्यांवर लाठ्या चालवल्या नाहीत, आज चालवल्या...अमरावती पोलिसांनी खरा अहवाल द्यावा'
'बाळासाहेब आज जिवंत असते तर थोबाडीत मारली असती', चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका

भाजपकडून राज्यात दंगली पेटवण्याचं काम सुरु असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केला. संजय राऊतांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी सडकून टीका केली आहे. "संजय राऊत यांच्या वक्तव्याची कीव येते. राजकारण करण्यासाठी किली लाचार व्हाल. आज स्वर्गीय बाळासाहेब असते तर त्यांनी एक थोबाडीत मारली असती."

त्रिपुरा येथे मुस्लीम समाजाच्या प्रार्थनास्थळाच्या झालेल्या विटंबनेवरुन सध्या राज्यात मालेगाव, अमरावती, वाशिम येथे आंदोलन सुरु आहेत. शुक्रवारी मालेगाव येथे झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांच्या काही गाड्याही फोडण्यात आल्या.

जाणून घ्या काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याची मला खूप कीव येते. राज्य करा ना, मुस्लिमांची मतंही मिळवा त्याला कोण नाही म्हणतंय. ५ टक्के मुस्लीम गडबड करतात, ९५ टक्के बाकीचे प्रामाणिक आहेत. मालेगाव, नांदेड मध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्यावर यापूर्वीसारखी टीका करा. ५ टक्के जे मुस्लीम गडबड करत आहेत त्यांच्यावरही तुम्ही टीका करणार नाही का?

प्रत्येक गोष्टीत यांना भाजपचा हात दिसतो. एसटी संपही आम्ही सुरू केला, आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर आम्हीच फोडला, शेतकऱ्यांना हे सरकार पैसे देत होतं, पण आम्हीच त्यांना रोखलं. सगळं आम्हीच केलं. अरे काय चाललंय काय? लोकांना कळत नाही का?, असा खोचक सवाल पाटील यांनी केला. यांना जिथं-तिथं भाजपचा हात दिसतोय. भाजपचा हात असेल तर कापून काढा. तुम्ही तिघे एकत्र आहात ना असंही पाटील यांनी सुनावलं.

'बाळासाहेब आज जिवंत असते तर थोबाडीत मारली असती', चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका
Maharashtra violence : अमरावतीत पुन्हा हिसेंचा भडका; दगडफेक-जाळपोळ, संचारबंदी लागू

अमरावतीत पोलिसांनी खरा अहवाल द्यावा -

अमरावती पोलिसांनी खरा अहवाल द्यावा, काल झालेल्या हिंसाचारात माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचं ऑफिस फोडलं गेलं नाही का? सामान्य माणसांची ऑफीसेस तोडली गेली नाही का? आज बंद केल्यावर पोलीस लाठ्या चालवत आहेत, काल ज्यांनी दुकानं फोडली त्यांच्यावर लाठ्या चालवल्या गेल्या नाहीत. मग जर लोकांच्या मनात याविषयी राग असेल तर बंद केला तर काय चुकलं असा सवालही पाटील यांनी विचारला.

भाजपवर टीका करताना काय म्हणाले होते संजय राऊत?

रझा अकादमी नावाची जी संघटना वातावरण बिघडवतेय, ती भाजपचीच 'सिस्टर कन्सर्न' आहे. राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपचा हा सगळा खेळ सुरू आहे. मी भाजपला इशारा देतो आहे आम्हाला हात लावाल तर तुमचे हात पोळतील. महाराष्ट्राला आग लावायची आणि आणि राज्य करता येत नाही अशी बोंब मारायची असाही आरोप संजय राऊत यांनी औरंगाबादच्या आक्रोश मोर्चात केला आहे.

'बाळासाहेब आज जिवंत असते तर थोबाडीत मारली असती', चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका
नरेंद्र मोदींचं सरकार म्हणजे निजामशाही, औरंगाबादमध्ये संजय राऊत यांचा आरोप

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in