'नवाब मलिकांनी बोलणं बंद केलं नाही तर.... शाहरुख खानलाही धमकी देण्यात आली होती'

समीर वानखेडेंनी शाहरुखला धमकी दिल्याचा नवाब मलिक यांचा आरोप
'नवाब मलिकांनी बोलणं बंद केलं नाही तर.... शाहरुख खानलाही धमकी देण्यात आली होती'

नवाब मलिकांनी बोलणं बंद करावं म्हणून शाहरुख खानला धमकी देण्यात आली होती. नवाब मलिकने अगर बोलना बंद नहीं किया तो तेरा बेटा लंबा जाएगा असं म्हणत शाहरुख खानला समीर वानखेडेंनी धमकी दिली होती असा आरोप आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

आर्यन खानला प्रतीक गाभा आणि आमीर फर्निचरवाला यांनी बोलावलं होतं. त्याने क्रुझचं तिकिट काढलं नव्हतं. आर्यनचं अपहरण करून 25 कोटींची खंडणी मागण्याचा खेळ सुरू झाला. एका सेल्फीने सगळा खेल बिघडवला हे वास्तव आहे. आर्यन खानच्या अपहरणाचा कट मोहित कंबोजने रचला होता. समीर वानखेडे आणि मोहीत कंबोज यांचे चांगले संबंध आहेत असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

आणखी काय म्हणाले नवाब मलिक?

ड्रग्ज पेडलर्सना अभय देण्यासाठी समीर वानखेडे प्रायव्हेट आर्मी चालवतात. मोहीत कंबोज, सुनील पाटील, के. पी. गोसावी हे सगळे त्याचाच भाग आहेत. प्रभाकर साईल माझ्याकडे आला होता त्याला मी काहीही पढवलं नाही. मी त्याला प्रतिज्ञापत्र करण्यास सांगितलं. माझी लढाई खोटारड्या समीर वाखेडेंच्या विरोधात आहे. समीर वानखेडे, व्ही. व्ही सिंग, असीस ऱंजन, वानखेडेंचा ड्रायव्हर माने ही चांडाळ चौकडी आहे. त्यांना हाकला असंही आवाहन नवाब मलिक यांनी केलं आहे. एवढंच नाही तर ड्रग्ज पेडलर्सना अभय द्यायचं, त्यांच्याद्वारे ट्रॅप लावयाचे आणि हाय प्रोफाईल लोकांना अडकवून खंडणी वसूल करायची हे करून समीर वानखेडेंनी या शहराला 'पाताल लोक' बनवलं असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.शाहरुख खानला पहिल्या दिवसापासून घाबरवलं जातं आहे की नवाब मलिक बोलायचे थांबले नाहीत तर तुला आरोपी करू. आता ते समोर येतील का नाही मला माहित नाही.

समीर वानखेडेंची चौकशी केली पाहिजे, समीर वानखेडे खूप लोकांना धमक्या देऊन घाबरवत आहेत. रविवारी काही गोष्टी समोर आणणार होतो त्या आणल्या आहेत. जोपर्यंत यातला व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत हा पिक्चर संपणार नाही. सुनील पाटील यांच्या नावे हॉटेल ललितमध्ये रूम बुक केली होती. तिथे घाणेरडे प्रकार चालत होते. मी त्याबद्दल आज फार मिळणार नाही. विजय पगारे यांनी मला ही माहिती दिली होती. मनिष भानुशाली, सॅम डिसुझा, केपी. गोसावी हे सगळे तिथे येत होते. तिथे मुलींना आणलं जात होतं, ड्रग्ज घेतले जात होते असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in