
आपल्या देशाची प्रतिमा जर अल्पसंख्याक विरोधी अशी झाली तर भारतीय कंपन्यांचं मोठं नुकसान होईल यांनी केलं आहे. RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अनेकदा देशाच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केलं आहे. अशात आता पुन्हा एकदा एक इशारा रघुराम राजन यांनी दिला आहे.
काय म्हणाले आहेत रघुराम राजन?
"भारताची प्रतिमा जगात अल्पसंख्याक विरोधी अशी तयार झाली तर भारतीय कंपन्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. भारतीय उत्पादनांसाठी मार्केटमध्ये ही धोक्याची घंटा आहे. भारताची प्रतिमा एकदा अशी तयार झाली तर विदेशातले लोक, तिथली सरकारं हे आपल्या राष्ट्रवार विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत. असं घडलं तर गुंतवणूकदारही आपल्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहणं बंद करू शकतात," असं म्हणत सावध होण्याचा इशारा रघुराम राजन यांनी दिला आहे.
टाइम्स नेटवर्कशी बोलताना रघुराम राजन यांनी हे वक्तव्य केलं आहे. लोकशाहीमध्ये अनेक गोष्टी सोप्या आसतात. त्यात नॅव्हिगेशनची गरज असते. लोकशाहीत वेळोवेळी सर्व पक्षांशी चर्चा करावी लागते. गरज पडली तर अनेक बदलही करावे लागतात. रशिया आणि चीन यांचं उदाहरण देत म्हटलं की या देशांमध्ये चेक आणि बॅलन्स नसल्याने त्यांना नुकसान सहन करावं लागतं आहे.
सध्या देशात धर्मावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन दिवशी हिंसेच्या काही घटना काही राज्यांमध्ये घडल्या. दुसरीकडे राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांवरून राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. अजान विरूद्ध हनुमान चालीसा किंवा महाआरती असं सगळं पाहण्यास मिळतं आहे. अशात सगळ्या वातावरणात रघुराम राजन यांनी महत्त्वाचा इशारा सरकारला दिला आहे.
भारतात प्रत्येक नागरिकाला एकसमान आणि सन्मानजनक वागणूक दिली जाते. तशी भारताची प्रतिमा होती. गरीब देश असूनही भारत आपल्या नागरिकांविषयी सन्मानाने वागणारा देश अशी प्रतिमा होती. आपल्या देशातल्या लोकांना चांगली वागणूक दिली अशी भारताची प्रतिमा आहे. मात्र सध्या या प्रतिमेत काही बदल होत आहेत. देशात हा संदेश गेला तर भारतीय कंपन्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.
भारताचे सेवा केंद्र निर्यात हे जागतिक स्तरावर व्यवसायाची संधी म्हणून सुस्थिती आहे. त्याच्या वाढीसाठी, प्रगतीसाठीही भरपूर वाव आहे. पाश्चात्य देशांमधील गोपनियतेचा संवेदनशील मुद्दा लक्षात घेऊन भारताच्या सेवा क्षेत्रातील निर्यात आक्रमकपणे वाढवणं आवश्यक आहे असंही राजन यांनी म्हटलं आहे.