...तर मी 'त्या' कार्यक्रमालाही जाणार नाही: अजित पवार

if there are more than 50 people i will not go to the event said ajit pawar on coronavirus
if there are more than 50 people i will not go to the event said ajit pawar on coronavirus(फोटो सौजन्य: Facebook)

वसंत मोरे, बारामती: राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केलं आहे. एवढंच नव्हे तर अजित पवारांनी यावेळी असंही म्हटलं की, 'मी 50 पेक्षा जास्त लोक असतील तर त्या कार्यक्रमाला देखील जाणार नाही.' ते बारामतीत बोलत होते.

पाहा कोरोनाच्या परिस्थितीबाबत काय म्हणाले अजित पवार

'राज्य सरकार मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत आहोत. राज्यात दुसरी लाट असताना आम्ही विविध विभागांना तयारीचे आदेश दिले होते. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरू केलं आहे.'

'दुसऱ्या लाटेत उद्योगाचा ऑक्सिजन इकडे वळवावा लागला. ज्याची ऑक्सिजन वाढवण्याची क्षमता आहेत. त्यांनी ती वाढवावी. यंदाच्या अधिवेशनात आम्ही ग्रामीण रुग्णालयाला मोठी मदत केली आहे. सरकार म्हणून आम्ही खबरदारी घेतो आहोत.'

'महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा नियोजनातील 20 टक्के खर्चाची मान्यता दिली आहे.'

'महाराष्ट्रात सगळ्यांनी लस घ्यावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला आहे. पहिला डोसच्या वेळी सगळ्यांना यश आलं आहे. पण दुसऱ्या डोसला ग्रामीण भागात प्रतिसाद नाही. आता घराघरात जाऊन लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.'

'माझं आवाहन आहे की, सगळ्यांनी नियमांचं पालन करावं. ज्या कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त लोक असतील तर मी त्या कार्यक्रमाला देखील जाणार नाही.'

if there are more than 50 people i will not go to the event said ajit pawar on coronavirus
महाराष्ट्रासह देशभरात रात्रीचा लॉकडाऊन लागणार का? नेमकं काय म्हणाले अजित पवार?

'त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाला मी विचारुनच जाणार आहे. आमच्यासहित सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. कारण आम्ही जर पालन केलं नाही तर लोकांना कोणत्या तोंडाने सांगणार.' असंही अजित पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in