MNS-BJP Alliance: ‘मनसे-भाजपची युती होणार असेल तर आनंदच आहे’, बाळा नांदगावकरांचं मोठं वक्तव्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील (Mumbai) ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. ही भेटीत जवळजवळ तासभराहून अधिक वेळ चर्चा सुरु होती. याच भेटीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी पत्रकारांशी बोलताना एक अत्यंत सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे.

‘मनसे आणि भाजप हे भविष्यात एकत्र येणार असतील तर आनंदच आहे.’ असं नांदगावकर म्हणाले. त्यामुळे आजच्या भेटीत मनसे-भाजप युतीवर (MNS-BJP Alliance) नक्कीच चर्चा झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

‘लपूनछपून काय करायचं? जर काही करायचं म्हटलं तर ते उघडच होणार आहे. अद्याप तरी आम्ही आमच्या पक्षाचं आणि ते त्यांच्या पक्षाचं काम करत आहेत. पण जर दोन पक्ष एकत्र येण्याचा भविष्यात प्रयत्न करत असतील तर आनंदचीच गोष्ट आहे.’ असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी युतीचे एक प्रकारे संकेतच दिले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले:

‘ठरल्याप्रमाणे चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंची भेट झाली’

ADVERTISEMENT

‘ठरल्याप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे राज ठाकरेंच्या भेटीला आले होते. जवळजवळ दोघांमध्ये 50 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. ही सदिच्छा भेट होती. या भेटीत त्यांच्या मनात काही शंका-कुशंका होत्या त्याबाबत त्यांनी राज ठाकरेंसोबत चर्चा केली. तुम्हाला कल्पना आहे की, राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते तेव्हा चंद्रकांत पाटीलही त्याच भागात दौऱ्याला होते. तिथे त्यांची 5-10 मिनिटांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की, तुमच्या ज्या काही भूमिका आहेत त्याविषयाची मला थोडी फार माहिती दिली तर बरं होईल.’ असं बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

‘त्या क्लिप्स पाहूनच चंद्रकांतदादांनी घेतली राज ठाकरेंची भेट’

‘राज ठाकरे त्यांना म्हणाले होते की, तुम्हाला माझ्या भाषणाच्या क्लिप्स पाठवतो. पण कामाच्या व्यापात ते पाठवणं राहून गेलं होतं. पण आमच्या संदीप देशपांडेने त्या चंद्रकांतदादांकडे पाठवून दिल्या होत्या. त्या क्लिप्स पाहून चंद्रकांत पाटील यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली.’ असंही नांदगावकर यांनी सांगितलं.

‘राजकारणात काहीही घडू शकतं’

‘आम्ही एकटे लढत होतो तेव्हा देखील पॉझिटिव्हच होतो आणि आता देखील सगळ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहोत. राजकारणात काय होईल हे आता सांगता येणार नाही. पण काही घडू शकतं एवढं निश्चित. मला असं वाटतं जनतेमध्ये काहीही गैरसमज नाही. त्यामुळे लोकांना भूमिका व्यवस्थित कळलेली आहे.’ असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी युतीबाबत मनसे सकारात्मक असल्याचीच एक प्रकारे कबुली दिली आहे.

‘दोन्ही पक्ष एकत्र आले तर आनंदच आहे’

‘मागच्या वेळेस आम्ही लाव रे व्हीडिओच्या माध्यमातून प्रचार केला तेव्हा तुम्ही म्हणालात की, आमचा शत्रू भाजप आहे. नंतर तुम्ही म्हणालात की, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत आहोत. असं तुम्हीच म्हणत होतात. त्यामुळे लपूनछपून काय करायचं? जर काही करायचं म्हटलं तर ते उघडच होणार आहे. अद्याप तरी आम्ही आमच्या पक्षाचं आणि ते त्यांच्या पक्षाचं काम करत आहेत. पण जर दोन पक्ष एकत्र येण्याचा भविष्यात प्रयत्न करत असतील तर आनंदचीच गोष्ट आहे.’ अशी प्रतिक्रिया देखील बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

MNS, BJP युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर

‘पवारांनी अंदाज घेऊन उद्धव साहेबांसोबत केलं ना सरकार’

‘राज ठाकरेंच्या रक्त्तातच हिंदुत्व आहे. आमचा पक्ष देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच पुढे जात आहे. मला वाटतं राजकारणात पुढे जी काही पावलं टाकयची असतात त्याचे ठोकताळे असतात. त्या ठोकताळ्याचा अंदाज प्रत्येक पक्ष घेत असतो. पवारांनी मध्यंतरी ठोकताळ्याचा अंदाज घेऊन उद्धव साहेबांना बोलावून केलं ना सरकार.. त्यामुळे हा देखील ठोकताळा आहे.’ असं बाळा नांदगावकर म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT