'सकाळचा प्रयोग यशस्वी झाला असता तर मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते', CM ठाकरेंचा थेट वार

'तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते की नाही?' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवरच निशाणा साधला.
if your experiment had been successful then malik deshmukh would been sitting with you cm thackeray attack on fadnavis
if your experiment had been successful then malik deshmukh would been sitting with you cm thackeray attack on fadnavis(फाइल फोटो)

मुंबई: 'तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते की नाही?' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाजपचं राजकारण हे विकृत स्वरुपाचं असल्याचीही टीका विधानसभेत केली आहे.

पाहा मुख्यमंत्री नेमकं काय-काय म्हणाले:

'हर्षवर्धन पाटलांना आधी झोप लागत नव्हती, मग त्यांनी झोपेचं औषध घेतलं'

'आता जे काही चाललं आहे की, एकेक गोष्टी बोलून मग केल्या जातात. आता मध्ये.. हर्षवर्धन पाटील जे आधी तुमच्याकडे होते. त्यांना झोप लागत नव्हती. मग झोपेचं औषध घेतलं. तिकडे जाऊन झोपायला लागले. हा अनुभव काही त्यांनी कानात नाही सांगितलाय तर एका सभेत सांगितला आहे. तर असं काय तुमच्याकडे झोपेचं औषध आहे मला कळत नाही.' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपवरच निशाणा साधला.

'तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते की नाही?'

'मला खरं सांगा.. आम्ही इकडे सगळे बसलेले भ्रष्टाचारी आहोत. आम्ही सगळे दाऊदची माणसं आहोत. पण तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते की नाही?' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला आणि फडणवीसांना भीमटोलाच हाणला.

'आम्ही जर का तुमचा गळ्यात पट्टा बांधला असता तर...'

'आम्ही जर का तुमचा गळ्यात पट्टा बांधला असता तर जी काही तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करताय.. ही अत्यंत नीच, निंदनीय आणि अत्यंत विकृत अशी गोष्ट आहे. की, एकमेकांच्या कुटुंबाची विकृत बदनामी करणं. अरे मर्द असशील तर मर्दासारखा ये अंगावर. बघतो तू आहे आणि मी आहे.' अशं थेट आव्हानच त्यांनी यावेळी भाजपलं दिलं आहे.

if your experiment had been successful then malik deshmukh would been sitting with you cm thackeray attack on fadnavis
'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो.. असं नाही करायचं सुधीरभाऊ', मुख्यमंत्र्यांचा जोरदार टोला

'केंद्रातील यंत्रणा काय करतात, थाळ्या वाजवा. दिवे पेटवा. दिवे घालवा हे करतात का? दिवे लावतात, तर दिव्याच्या प्रकाशात तरी बघा ना कोणती माणसं दाऊदची आहेत. तिरंदाज लक्ष्यभेद करतो. आता काय होतंय केंद्रीय यंत्रणा तो बाण आहेत. त्यांना हातात पकडून लक्ष्यावर खुपसलं जातंय. हे तुझं लक्ष्य आणि सगळंच. देवेंद्र फडणवीसांना केंद्राने रॉ, सीबीआयमध्ये घ्यायला पाहिजे म्हणजे काम अधिक वेगाने होईल. कारण ती माहिती तुम्ही ईडीकडे दिली. ईडीकडे इतके बेकार लोक आहेत का तिकडे?', असा सवाल उपस्थित करत ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला.

'माहिती देणारे तुम्हीच. आरोप करणारे तुम्हीच. चौकशी करणारे तुम्हीच. त्याप्रमाणे शिक्षाही हेच करतात. अशा केसेस तयार केल्यावर न्यायालय तरी काय करणार. सगळ्या यंत्रणा अशा राबवतात की, ती ईडी आहे की घरगडी आहे, हेच कळत नाहीये.' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या कारभारावर देखील सवाल उपस्थित केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in