मध्य प्रदेशातील सतना डेंटल क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या नर्सच्या हत्येप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
1 फेब्रुवारी 2021 रोजी, भानू केवट (नर्स) नावाची 23 वर्षीय तरूणी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने नोंदवली.
याप्रकरणी तपासात पोलिसांनी नर्स आणि डॉक्टरांचे मोबाईल रेकॉर्ड तपासले. त्यानंतर 20 फेब्रुवारी 2021 रोजी डॉ. आशुतोष त्रिपाठीला अटक करण्यात आली.
आरोपी डॉक्टरने पोलिसांना सांगितले की, त्याने 14 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजता क्लिनिकमध्येच भानूचा गळा दाबून खून केला.
15 डिसेंबरच्या रात्री दवाखान्याजवळील निर्जन स्थळी कुत्र्याच्या मृतदेहासोबत भानूचा मृतदेह पुरला असल्याचे आरोपीने सांगितले.
आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी ५८ दिवसांनंतर भानूचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला.
डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतर दंत शल्यचिकित्सक आशुतोष त्रिपाठीला न्यायालयात हजर करण्यात आले.
आता न्यायाधीश यतींद्र कुमार गुरू यांच्या न्यायालयाने आरोपी आशुतोष त्रिपाठीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
यासह 2 हजार रुपयांचा दंडही ठोठावला गेला आहे.