Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 12 हजार 160 नव्या रूग्णांचं निदान, 11 मृत्यूंची नोंद

वाढत्या कोरोना रूग्ण संख्येने वाढवलं महाराष्ट्राचं टेन्शन
Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 12 हजार 160 नव्या रूग्णांचं निदान, 11 मृत्यूंची नोंद
कोरोना रूग्ण (फाइल फोटो)

महाराष्ट्रात दिवसभरात 12 हजार 160 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे तर 11 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.11 टक्के इतका नोंदवला गेला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 1748 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 65 लाख 14 हजार 358 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.5 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 93 लाख 70 हजार 95 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 67 लाख 12 हजार 28 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 32 हजार 610 व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत तर 1096 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

महाराष्ट्रात दिवसभरात 68 ओमिक्रॉन रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 34 रूग्णांचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि 34 रूग्णांचा अहवाल राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने दिले आहेत.

कोरोना रूग्ण
ओमिक्रॉन बाधितांची संख्या फेब्रुवारीत पोहोचणार उच्चांकांवर; आयआयटीतील प्राध्यापकाचा दावा

आज आढळलेले 68 रूग्ण कुठे आहेत?

मुंबई-40

पुणे मनपा-14

नागपूर-4

पुणे ग्रामीण आणि पनवेल-प्रत्येकी 3

कोल्हापूर, नवी मुंबई,रायगड आणि सातारा-प्रत्येकी 1

राज्यात आता ओमिक्रॉन रूग्णांची एकूण संख्या 578 झाली आहे. यातले सर्वाधिक 368 रूग्ण मुंबईत आहेत. 578 पैकी 259 रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

महारा्ष्ट्रात आज घडीला 52 हजार 422 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 12 हजार 160 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 67 लाख 12 हजार 28 झाली आहे.

कोरोना रूग्ण
Omicron Variant: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का?

मुंबईत दिवसभरात 8082 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात दोन मृत्यू झाले आहेत. दिवसभरात 622 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज घडीला 37 हजार 274 सक्रिय रूग्ण आहेत. तर कोरोनामुळे मुंबईत आत्तापर्यंत 16 हजार 379 मृत्यू झाले आहेत.

आज जे दोन मृत्यू नोंदवले गेले त्यातील एक पुरूष आणि एक महिला आहे. दोघेही 60 वर्षांच्या वरील वयाचे होते तसंच दोन्ही रूग्ण सहव्याधी असलेले होते. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. मुंबईचा रूग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट 93 टक्के इतका झाला आहे. मुंबईचा डबलिंग रेट 138 दिवसांवर गेला आहे. तर मुंबईचा कोव्हिड ग्रोथ रेट 27 डिसेंबर ते 2 जानेवारी या आठवड्यात 0.50 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर 4 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जातंय. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in