Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 26 हजार 538 नव्या रूग्णांचं निदान, 8 मृत्यूंची नोंद

Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 26 हजार 538 नव्या रूग्णांचं निदान, 8 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या (फाइल फोटो, सौजन्य - PTI)

महाराष्ट्रात दिवसभरात 26 हजार 538 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 8 मृत्यू झाल्याचंही नोंदवलं गेलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा सुरू झाला आहे हेच हे आकडे सांगत आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 5331 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 65 लाख 24 हजार 247 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.55 टक्के झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 97 लाख 77 हजार 7 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 67 लाख 57 हजार 32 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 13 हजार 758 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1366 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या वाढली
कोरोना रुग्णांची संख्या वाढली (प्रातिनिधिक फोटो)

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 144 नवे रूग्ण

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे नवे 144 रूग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांचे अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिले आहेत.

कुठे आहेत हे 144 रूग्ण

मुंबई-100

नागपूर-11

ठाणे आणि पुणे मनपा-7

पिंपरी चिंचवड-6

कोल्हापूर -5

अमरावती, उल्हासनगर, भिवंडी-प्रत्येकी 2

पनवेल आणि उस्मानाबाद- प्रत्येकी 1

एकूण - 144

महाराष्ट्रातील ओमिक्रॉन रूग्णांची एकूण संख्या आता 797 झाली आहे. यातले 508 रूग्ण एकट्या मुंबईत आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या
ओमिक्रॉन बाधितांची संख्या फेब्रुवारीत पोहोचणार उच्चांकांवर; आयआयटीतील प्राध्यापकाचा दावा

पुणे मनपामध्ये 78 रूग्ण, पिंपरी चिंचवडमध्ये 44, ठाणे मनपा 29, पुणे ग्रामीण 26, नागपूर 24, पनवेल 17, नवी मुंबई 10, कोल्हापूर 10, सातारा 8, कल्याण डोंबिवली 7, उस्मानाबाद 6, भिवंडी 5, वसई विरार 4, नांदेड 3, अमरावती 3, उल्हासनगर 3, औरंगाबाद 2, बुलढाणा 2, मीरा भाईंदर 2, सांगली 2, लातूर 1, अहमदनगर 1, अकोला 1, रायगड 1 असे आहेत.

यातील 26 रूग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी एक रूग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहेत. 7 रूग्ण ठाणे आणि चार रूग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. 9 रूग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रूग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या
वडिलांना कोरोना, तर आईला कर्करोगामुळे गमावलं; कोण आहे Bulli Bai अ‍ॅपची मास्टरमाइंड श्वेता?

यातील 330 रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्याने रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचंही क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून 2541 नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 102 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

महाराष्ट्रात आज घडीला 87 हजार 505 सक्रिय रूग्ण आहेत. दिवसभरात 26 हजार 538 रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 67 लाख 57 हजार 32 इतकी झाली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in