Covid 19 : महाराष्ट्रात कोरोनाचे 33 हजार 470 नवे रूग्ण, ओमिक्रॉनच्या 31 रूग्णांची नोंद

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्रात कोरोनाच्या 33 हजार 470 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 29 हजार 671 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 66 लाख 2 हजार 103 नवे रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 8 मृत्यूंची नोंद झाली असून राज्यातील मृत्यूदर 2.3 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 7 लाख 18 हजार 911 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 69 लाख 53 हजार 514 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 12 लाख 46 हजार 749 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 2505 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. ओमिक्रॉनचे राज्यात 31 नवे रूग्ण आढळले आहेत.

कोव्हिड
कोव्हिड प्रातिनिधिक फोटो

हे 31 रूग्ण पुणे मनपामध्ये 28, पुणे ग्रामीणमध्ये 2 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1 असे आहेत. आजपर्यंत राज्यात 1247 ओमिक्रॉन रूग्ण रिपोर्ट झाले आहेत. त्यातले 606 रूग्ण मुंबईत आहेत. पुणे मनपा 251, पिंपरी 69, सांगली 59, नागपूर 51, ठाणे मनपा 48, पुणे ग्रामीण 34, कोल्हापूर 18, पनवेल 17, उस्मानाबाद 11, नवी मुंबई आणि सातारा प्रत्येकी 10, अमरावती 9, कल्याण डोंबिवली 7, बुलढाणा आणि वसई विरारमध्ये प्रत्येकी 6, भिवंडी आणि अकोला-प्रत्येकी 5, नांदेड, उल्हासनगर, औरंगाबाद, मीरा भाईंदर आणि गोंदिया प्रत्येकी 3, अहमदनगर, गडचिरोली, लातूर आणि नंदुरबार प्रत्येकी 2, जालना आणि रायगडमध्ये प्रत्येकी 1 असे आहेत.

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या वाढल्याने राज्यात रात्रीची संचारबंदी, असे आहेत नवे निर्बंध

यापैकी 467 रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयातून घरी सोडण्यातून आले आहेत. राज्यात आज घडीला 2 लाख 6 हजार 46 सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 33 हजार 470 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 69 लाख 53 हजार 514 झाली आहे.

कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)
कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)PTI

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in