
महाराष्ट्रात दिवसभरात 34 हजार 424 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर आज दिवसभरात राज्यात 18 हजार 967 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 66 लाख 21 हजार 70 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 94.75 टक्के इतका झाला आहे.
महाराष्ट्रात दिवसभरात 22 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.2 टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 9 लाख 28 हजार 954 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 69 लाख 87 हजार 938 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्या 14 लाख 64 हजार 987 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 3032 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 34 नवे रूग्ण आढळले आहेत. आज हे सगळे रूग्ण बी. जे. वैद्यकीय महविद्यालयाने रिपोर्ट केले आहेत. यातले 25 रूग्ण पुणे मनपा, 6 रूग्ण पुणे ग्रामीण, 2 सोलापूर, 1 पनवेल असे आहेत. राज्यात आता ओमिक्रॉनचे 1281 रूग्ण झाले आहेत.
कुठे आहेत हे 1281 रूग्ण ?
मुंबई-606
पुणे मनपा-276
पिंपरी चिंचवड-69
सांगली-59
नागपूर-51
ठाणे मनपा-48
पुणे ग्रामीण-40
कोल्हापूर-18
पनवेल-18
उस्मानाबाद-11
नवी मुंबई-10
सातारा-10
अमरावती-9
कल्याण डोंबिवली-7
बुलढाणा-6
वसई विरार-6
भिवंडी-5
अकोला-5
नांदेड-3
उल्हासनगर-3
औरंगाबाद-3
मीरा भाईंदर-3
गोंदिया-3
अहमदनगर-2
गडचिरोली-2
लातूर-2
नंदुरबार-2
सोलापूर-2
जालना-1
रायगड-1
एकूण-1281
यातील 26 रूग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रूग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहेत. सात रूग्ण ठाणे आणि चार कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर नऊ रूग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रूग्ण आढळले आहेत.
यापैकी 499 रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचं क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणात आत्तापर्यंत 4092 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी 80 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
महाराष्ट्रात आज घडीला 2 लाख 21 हजार 477 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 34 हजार 424 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 69 लाख 87 हजार 938 इतकी झाली आहे.