Covid 19 : बापरे! महाराष्ट्रात दिवसभरात 36 हजार 265 नव्या रूग्णांचं निदान, 13 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात ८ हजार ९०७ रूग्ण दिवसभरात बरे होऊन घरी गेले आहेत
Covid 19 : बापरे! महाराष्ट्रात दिवसभरात 36 हजार 265 नव्या रूग्णांचं निदान, 13 मृत्यूंची नोंद
कोरोना रुग्णसंख्या

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. महाराष्ट्रात दिवसभरात 36 हजार 265 नवे रूग्ण आढळले आहेत. तर मृत्यूदर 2.8 टक्के इतका नोंदवला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख हा चढताच आहे ज्यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात आज दिवसभरात 8907 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 65 लाख 33 हजार 154 रूग्ण बरे झाले आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 99 लाख 47 हजार 436 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 67 लाख 93 हजार 297 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 85 हजार 758 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1368 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या (फाइल फोटो, सौजन्य - PTI)

महाराष्ट्रात दिवसभरात 79 नवे ओमिक्रॉन संसर्ग असणारे रूग्ण आढळले आहेत. हे सर्व अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिले आहेत.

कुठे आहेत ओमिक्रॉनचे 57 रूग्ण?

मुंबई-57

ठाणे मनपा-7

नागपूर-6

पुणे मनपा-5

पुणे ग्रामीण-3

पिंपरी चिंचवड-1

एकूण-79

महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या रूग्णांची एकूण संख्या 876 इतकी झाली आहे. यातले 565 रूग्ण हे एकट्या मुंबईत आहेत.

876 पैकी 381 रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. महाराष्ट्रात आज घडीला 1 लाख 14 हजार 847 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 36 हजार 265 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील रूग्णांची एकूण संख्या आता 67 लाख 93 हजार 297 इतकी झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कोरोना रुग्णसंख्या
वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे मुंबई लोकल बंद होणार का? आयुक्त इकबाल चहल म्हणाले...

शरद पवार यांनी कोणत्या सूचना केल्या ? याबाबत राजेश टोपे यांनी दिलेली माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये आज आढावा बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ज्या गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, त्या गोष्टींवर आधीच निर्बंध आहेत. मात्र कठोर निर्बंध लावण्याच्या सूचना द्या.

तसेच लसीकरण वाढवण्यासाठी शक्य तेवढी कठोर पावलंही उचलण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.

लसीकरण कसं वाढेल, यासाठी आम्हीदेखील प्रयत्न करू, असं आश्वासन पवार यांनी दिलं.

गॅदरींग, मेळावे, जे आहेत, यासंदर्भातल्या सूचना कठोरपणे पाळल्या पाहिजेत.

अनावश्यक गोष्टींसाठी एकत्र येणे टाळले पाहिजे.

आणखी काय म्हणाले राजेश टोपे?

शरद पवार यांचा रोज सगळ्यांची संपर्क असतो आणि त्यांना राज्यातील करोना संसर्गाची वाढत असलेली परिस्थिती आहे, की सध्या साधारणपणे काल 25 हजारांच्या दरम्यान पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. उद्या कदाचित 35 हजारही असू शकतील. ही जी आम्ही आकडेवारी सांगितली होती, त्याबाबत अधिक गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. त्यामुळे त्यांनी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि माझ्यासोबत काही वेळ चर्चा केली. ज्यामध्ये सध्याची परिस्थिती त्यावरील उपाय आणि काय निर्बंध आता सध्या निर्बंध जे आहेत त्याची अंमलबजावणी होती आहे का? नाही होत तर त्यालाय करावं लागेल? याबाबतही विचारणा केल्याचं टोपे यांनी सांगितलं. मात्र तूर्तास कठोर लॉकडाऊन लावण्याचा किंवा लोकल सेवा बंद करण्याचा सरकारचा विचार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in