Covid 19 : महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान! दिवसभरात 41 हजार 434 नवे रूग्ण तर ओमिक्रॉनचे 133 रूग्ण

महाराष्ट्रात दिवसभरात 13 मृत्यूंची नोंद
Covid 19 : महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान! दिवसभरात 41 हजार 434 नवे रूग्ण तर ओमिक्रॉनचे 133 रूग्ण
महाराष्ट्रातील कोरोना चाचणी (फोटो सौजन्य - India Today)

महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनाचे 41 हजार 434 नवे रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 13 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.5 टक्के झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजार 671 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 65 लाख 57 हजार 81 रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 95.37 टक्के झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 3 लाख 42 हजार 173 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 68 लाख 75 हजार 656 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8 लाख 45 हजार 89 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1851 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

कोरोना
कोरोना Photo- India Today

महाराष्ट्रात दिवसभरात 133 नवे रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 130 रूग्णांचा अहवाल भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने आणि तीन रूग्णांचा अहवाल गुजरातने दिला आहे.

कुठे कुठे आहेत हे रूग्ण?

पुणे मनपा-118

पिंपरी चिंचवड-8

पुणे ग्रामीण-3

वसई विरार-2

अहमदनगर -1

मुंबई-1

महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटने बाधित झालेल्या रूग्णांची संघ्या ही 1006 झाली आहे. यातले

महाराष्ट्रातील कोरोना चाचणी
Omicron : ओमिक्रॉन व्हेरिएंटला हलक्यात घेऊ नका, WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा

सर्वाधिक 566 रूग्ण मुंबईत आहेत. पुण्यात 201, पिंपरी 53, ठाणे मनपा 36, पुणे ग्रामीण 32, नागपूर 30, पनवेल 17, नवी मुंबई आणि कोल्हापूर प्रत्येकी 10, सातारा 8, कल्याण डोंबिवली-7, उस्मानाबाद आणि वसई विरार प्रत्येकी 6, भिवंडी 5, नांदेड, अमरावती आणि उल्हासनगर प्रत्येकी 3, औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर, सांगली आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी 2, लातूर, अकोला आणि रायगडमध्ये प्रत्येकी 1 असे 1009 रूग्ण आहेत. यातील 26 रूग्ण हे इतर राज्यातील आहेत.

1009 पैकी 439 रूग्णांना त्यांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्याने रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचंही सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आत्तापर्यंत 3076 प्रयोगशाळा नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत यापैकी 97 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

महाराष्ट्रात आज घडीला 1 लाख 73 हजार 238 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 41 हजार 434 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या आता 68 लाख 75 हजार 656 झाली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in