Covid 19 : धास्ती वाढली! महाराष्ट्रात कोरोनाच्या 5368 रूग्णांची नोंद, दिवसभरात 22 मृत्यू

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.65 टक्के इतका झाला आहे
Covid 19 : धास्ती वाढली! महाराष्ट्रात कोरोनाच्या 5368 रूग्णांची नोंद, दिवसभरात 22 मृत्यू
महाराष्ट्रात कोरोना रूग्ण चाचणी (फाइल फोटो)

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक काही केल्या थांबण्याचं नाव घेताना दिसून येत नाहीये. दिवसभरात राज्यात 5368 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 22 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोना रूग्ण चाचणी
लस घेतलेल्यांचंही 'ओमिक्रॉन'ने वाढवलं टेन्शन! केंद्राच्या माहितीनंतर तज्ज्ञांचा इशारा

दिवसभरात राज्यात 1193 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 6507330 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.55 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 88 लाख 87 हजार 303 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 70 हजार 754 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 33 हजार 748 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉनचे 198 नवे रूग्ण आढळले आहेत. हे सगळे रूग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने म्हणजेच NIV ने नोंदवले आहेत. या 198 रूग्णांमध्ये 30 आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं आहे.Omicron Variant/India today

198 रूग्ण कुठे आहेत?

मुंबई-190

ठाणे मनपा- 4

सातारा, नांदेड, पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड- प्रत्येकी 1

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग़्णालयात नायजेरिया प्रवासाचा इतिहास असलेल्या एका 52 वर्षाच्या पुरुषाचे 28 डिसेंबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. या रुग्णास मागील 13 वर्षांपासून मधुमेह होता. या रुग्णाचा मृत्यू कोविड शिवाय इतर कारणांनी (नॉन कोविड मृत्यू) झालेला आहे. आजच्या एन आय व्ही अहवालात त्याला ओमायक्रॉन विषाणू संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात कोरोना रूग्ण चाचणी
Coronavirus Updates : डेल्टापेक्षा वेगाने पसरतोय ओमिक्रॉन, WHO ची माहिती

आजपर्यंत राज्यात एकूण 450 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत

मुंबई-327

पिंपरी चिंचवड-26

पुणे ग्रामीण-18

पुणे मनपा आणि ठाणे मनपा-12

नवी मुंबई, पनवेल आणि कल्याण डोंबिवली प्रत्येकी 7

नागपूर आणि सातारा प्रत्येकी 6

उस्मानाबाद 5

वसई विरार आणि नादेंड प्रत्येकी 3

औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा प्रत्येकी 2

लातूर, अहमदनगर, अकोला, मीरा भाईंदर, कोल्हापूर प्रत्येकी 1

एकूण-450

यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी एक रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. सात रुग्ण ठाणे आणि चार रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर नऊ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

यापैकी 125 रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in