महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्ण बरे, 100 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 811 नवे रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण 61 लाख 95 हजार 744 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.86 टक्के इतके झाले आहे. आज महाराष्ट्रात 4 हजार 145 नवीन रूग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज 100 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.11 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 3 लाख 53 हजार 129 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 2530 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज घडीला 62 हजार 452 सक्रिय रूग्ण आहेत. आज महाराष्ट्रात 4 हजार 145 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 63 लाख 96 हजार 805 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 10 नवे रूग्ण

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे आणखी 10 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील डेल्टा प्लस रूग्णांची संख्या ही 76 झाली आहे. महाराष्ट्रात आढळलेल्या डेल्टा प्लस रूग्णांमध्ये कोल्हापूर 6, रत्नागिरी 3, सिंधुदुर्ग 1, या रूग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत आढळलेल्या 76 पैकी पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने बाधित असलेल्या पाच रूग्णांचा आत्तापर्यंत राज्यात मृत्यू झाला आहे. त्यातले दोन रूग्ण रत्नागिरीत, मुंबई, बीड आणि रायगड या ठिकाणी प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. डेल्टा प्लसच्या मृत्यू पाचही रूग्ण 65 वर्षांवरचे होते आणि त्यांना जोखमीचे आजारही झाले होते. पाचजणांपैकी दोघांनी कोव्हिशिल्ड या लसीचे दोन डोस घेतले होते तर दोघांनी कोणतीही लस घेतली नव्हती. आणखी एका रूग्णाच्या लसीकरणाबाबत माहिती मिळाली नाही असं आरोग्य विभागाने सांगितलं.

ADVERTISEMENT

आतापर्यंत राज्यात ५ रुग्णांचा डेल्टा प्लस व्हेरिएंटने मृत्यू झाला असला तरीही लोकांनी यामुळे घाबरुन जाण्याचं कारण नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. डेल्टा प्लस विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचंही टोपे यांनी सांगितलं. त्यामुळे लोकांनी घाबरुन न जाता कोरोनाचे सर्व नियम, मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं याचं पालन करावं अशी विनंती टोपे यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT