महाराष्ट्रात दिवसभरात 6 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्ण पॉझिटिव्ह, 224 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 6 हजार 269 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर आज दिवसभरात 7 हजार 332 रूग्णांना आज दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात 224 मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तपर्यंत राज्यात एकूण 62 लाख 58 हजार 79 रूग्णांना कोरोना झाला आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण 1 लाख 31 हजार 429 कोरोना मृत्यू झाले आहेत. आजपर्यंत एकूण 60 लाख 29 हजार 817 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 कोटी 66 लाख 44 हजार 448 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 58 हजार 79 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सध्या राज्यात 5 लाख 27 हजार 754 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 3 हजार 621 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 93 हजार 749 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 6 हजार 269 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 62 लाख 58 हजार 79 एवढी झाली आहे.

मुंबईत 413 नवे पॉझिटिव्ह रूग्ण

ADVERTISEMENT

मुंबईत दिवसभरात 413 नवे पॉझिटिव्ह कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 611 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 7 लाख 9 हजार 809 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट हा 97 टक्के इतका झाला आहे. मुंबईत आज घडीला 5 हजार 799 सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईचा डबलिंग रेट आता 1241 दिवस इतका आहे. मुंबईत आज 9 रूग्णांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. यातले 5 रूग्ण हे सहव्याधी असलेले होते. अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT