Corona in Mumbai:  मुंबईतील तब्बल 523 पोलिसांना कोरोनाची लागण, 18 IPS देखील Covid पॉझिटिव्ह
in mumbai 523 policemen infected with corona 18 IPS officers also affected 2 lost their lives

Corona in Mumbai: मुंबईतील तब्बल 523 पोलिसांना कोरोनाची लागण, 18 IPS देखील Covid पॉझिटिव्ह

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत येथे कोरोनाचे 33,470 रुग्ण आढळले आहेत. एवढेच नाही तर सर्वात चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक बाधित शहर असलेल्या मुंबईतही मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. येथे गेल्या 48 तासांत 114 पोलीस कर्मचार्‍यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यादरम्यान दोघांना कोरोनामुळे आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्याचबरोबर मुंबईत आतापर्यंत 523 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईत ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मोठ्या संख्येने आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मुंबईत 18 आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 1 सहआयुक्त, 4 अतिरिक्त आयुक्त आणि 13 DCP यांचा समावेश आहे.

in mumbai 523 policemen infected with corona 18 IPS officers also affected 2 lost their lives
Corona: महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे, राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

दिल्लीतही 300 पोलिसांना लागण

महाराष्ट्राव्यतिरिक्त दिल्लीतही मोठ्या प्रमाणात पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर येत आहेत. दिल्लीत 300 हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी, अतिरिक्त आयुक्त चिन्मय बिस्वाल आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे 33 हजार 470 नवे रूग्ण, ओमिक्रॉनच्या 31 रूग्णांची नोंद

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 33 हजार 470 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 29 हजार 671 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 66 लाख 2 हजार 103 नवे रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 8 मृत्यूंची नोंद झाली असून राज्यातील मृत्यूदर 2.3 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 7 लाख 18 हजार 911 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 69 लाख 53 हजार 514 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 12 लाख 46 हजार 749 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 2505 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. ओमिक्रॉनचे राज्यात 31 नवे रूग्ण आढळले आहेत.

हे 31 रूग्ण पुणे मनपामध्ये 28, पुणे ग्रामीणमध्ये 2 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1 असे आहेत. आजपर्यंत राज्यात 1247 ओमिक्रॉन रूग्ण रिपोर्ट झाले आहेत. त्यातले 606 रूग्ण मुंबईत आहेत. पुणे मनपा 251, पिंपरी 69, सांगली 59, नागपूर 51, ठाणे मनपा 48, पुणे ग्रामीण 34, कोल्हापूर 18, पनवेल 17, उस्मानाबाद 11, नवी मुंबई आणि सातारा प्रत्येकी 10, अमरावती 9, कल्याण डोंबिवली 7, बुलढाणा आणि वसई विरारमध्ये प्रत्येकी 6, भिवंडी आणि अकोला-प्रत्येकी 5, नांदेड, उल्हासनगर, औरंगाबाद, मीरा भाईंदर आणि गोंदिया प्रत्येकी 3, अहमदनगर, गडचिरोली, लातूर आणि नंदुरबार प्रत्येकी 2, जालना आणि रायगडमध्ये प्रत्येकी 1 असे आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in