Mumbai Anti Narcotics Cell: मुंबईत तब्बल 1 कोटी किंमतीचा अफगाणी चरस जप्त, दोघांच्या मुसक्या आवळल्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा अफगाणी चरस छापा मारुन जप्त केला आहे. यावेळी दोन आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. अँटी नार्कोटिक्स सेलला आरोपींकडून तब्बल 2 किलो चरस सापडला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव मोहम्मद जफर अब्दुल सिद्दीकी आणि समीर शेख असं असल्याची माहिती समजते आहे. हे दोन्ही आरोपी मुंबईच्या अंधेरी भागात राहणारे आहेत.

दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या एका गुप्त माहितेच्या आधारे एएनसीच्या वांद्रे युनिटने दोघांना अंधेरीच्या गावदेवी डोंगर भागातून अटक केली. यानंतर जेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी या आरोपीची चौकशी केली तेव्हा त्यांनी अशी माहिती दिली की, त्यांनी हा चरस उत्तरप्रदेशच्या कानपूर भागातून आणला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हा चरस ते आपल्या हाय सोसायटीमध्ये राहणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहचवत होते. दरम्यान, यापैकी काही चरस हा झोपडपट्टी भागामध्ये देखील ते विकत होते.

एएनसीच्या मते, आरोपींचे संबंध हे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीशी असण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, आता अँटी नार्कोटिक्स सेलकडून आरोपींच्या दुसऱ्या साथीदारांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

ADVERTISEMENT

यावेळी अधिकाऱ्यांनी अशीही माहिती दिली की, आरोपींकडून जो चरस जप्त करण्यात आला आहे तो अतिशय उच्च दर्जाचा असा अफगाणी चरस आहे. या चरसच्या सेवनाने मानवी शरीरावर अतिशय गंभीर स्वरुपाचे परिणाम होतात. तसंच तो या चरसच्या अंमलाखाली राहतो आणि पुढे त्याचीच त्याला सवय लागते.

ADVERTISEMENT

नागपूर : ड्रग्जमाफीयांविरोधात मोठी कारवाई, लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त

मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींवर मुंबई पोलिसांची करडी नजर असते. मात्र, असं असून देखील अनेक तस्कर हे अंमली पदार्थ परराज्यातून आणून मुंबईसारख्या शहरात विकण्याचा प्रयत्न करतात. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा बसावा यासाठी प्रशासनाकडून देखील सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT