Covid Update : 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येची उसळी, 284 मृत्यू; ओमिक्रॉन रुग्ण 1500च्या पुढे

चिंतेचं कारण असलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्याही वेगाने वाढ होताना दिसत आहे...
Covid Update : 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येची उसळी, 284 मृत्यू; ओमिक्रॉन रुग्ण 1500च्या पुढे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंगावताना दिसू लागलं आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून, मागील 24 तासांत देशात 27,553 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याच कालावधीत देशात 284 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ओमिक्रॉनचा प्रसारही वेगानं होत असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. देशातील ओमिक्रॉन बाधितांची एकूण संख्या 1,500च्या पुढे गेली आहे.

कोरोनाच्या दोन लाटांच्या तडाख्यातून सावरल्यानंतर देशासमोर तिसऱ्या लाटेचं आव्हान निर्माण होताना दिसत आहे. मागील आठवडाभराच्या कालावधीत देशात कोरोनाचा संसर्ग वाढला असून, रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 27 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले अ्सून, शुक्रवारच्या तुलनेत 21 टक्क्यांनी रुग्णवाढ झाली आहे.

Covid Update : 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येची उसळी, 284 मृत्यू; ओमिक्रॉन रुग्ण 1500च्या पुढे
...त्या दिवशी राज्यात लॉकडाऊन लागेल; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं भाष्य

तिसऱ्या लाटेच्या सावटामुळे केंद्रासह सर्वच राज्ये सतर्क झाली असून, अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाही लागू करण्यात आल्या आहेत. अनेक राज्यांत निर्बंध लावण्यात आली आहे. दरम्यान, 24 तासांत आढळून आलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात 9,170 आढळले आहेत. तर त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल 4512, दिल्ली 2,716, केरळ 2435, तामिळनाडू 1489 असे रुग्ण आढळून आले आहेत.

Covid Update : 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येची उसळी, 284 मृत्यू; ओमिक्रॉन रुग्ण 1500च्या पुढे
Covid 19 : महाराष्ट्र वेगाने तिसऱ्या लाटेकडे! दिवसभरात 9170 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 73.76 टक्के रुग्ण पाच राज्यांत आढळून आले असून, त्यापैकी 33.28 टक्के महाराष्ट्रा आढळले आहेत.

ओमिक्रॉन रुग्णांची संख्या दीड हजाराच्या पार

देशात कोरोना रुग्णसंख्येबरोबरच ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्याही गतीने वाढत आहे. आतापर्यंत देशात 1525 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 560 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर 965 रुग्ण उपचाराधीन आहेत. ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in