Covid19: तुफान वेगाने पसरतोय कोरोना, देशात 24 तासात तब्बल 2 लाख 68 हजार जण पॉझिटिव्ह

देशात काल दिवसभरात कोरोनाचे तब्बल 2 लाख 68 हजार रुग्ण आढळून आले आहेत.
Covid19: तुफान वेगाने पसरतोय कोरोना, देशात 
24 तासात तब्बल 2 लाख 68 हजार जण पॉझिटिव्ह
india reports 268833 fresh covid cases 4631 more than 14 jan and 122684 recoveries in the last 24 hours(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 2,68,833 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे कालच्या (14 जानेवारी) तुलनेत 4,631 ने अधिक आहेत. नवीन रुग्ण आढळल्यानंतर देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 14 लाख 17 हजार 820 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णांमध्ये 1,45,747 ची वाढ झाली आहे. त्याचवेळी गेल्या 24 तासात 1,22,684 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा 16.66 टक्क्यांवर पोहोचला आहे.

त्याच वेळी, ओमिक्रॉनचे 6 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाचे नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचे 6 हजार 41 रुग्ण आढळले आहेत.

देशात शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी आढळलेल्या रुग्णांपेक्षा 1.8 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. येथे कोरोनाचे 43,211 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर कर्नाटकात 28,723, दिल्लीत 24,383 तामिळनाडूमध्ये 23,459 आणि पश्चिम बंगालमध्ये 22,645 रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाच्या एकूण नवीन रुग्णांपैकी 52.97% नवीन रुग्ण या पाच राज्यांमधील आहेत. नवीन रुग्णांपैकी 16.07% एकट्या महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्याच वेळी, गेल्या 24 तासात देशात 402 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ज्यामुळे एकूण मृतांची संख्या 4,85,752 वर पोहोचली आहे. देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.83 टक्के आहे. गेल्या 24 तासात एकूण 1,22,684 रुग्ण बरे झाले असून, देशभरातील एकूण बरे झालेल्यांची संख्या 3,49,47,390 एवढी झाली आहे.

india reports 268833 fresh covid cases 4631 more than 14 jan and 122684 recoveries in the last 24 hours
Covid 19 : मुंबईत पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा दुप्पट रूग्णांना डिस्चार्ज, दिवसभरात 9 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात दिवसभरात 43 हजार 211 नवे रूग्ण, ओमिक्रॉनचे 238 रूग्ण

महाराष्ट्रात काल दिवसभरात 43 हजार 211 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 19 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 1.98 टक्के झाला आहे. दिवसभरात 33 हजार 356 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 67 लाख 17 हजार 125 कोरोना बाधित रूग्ण घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाणे 94.28 टक्के इतके झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 15 लाख 64 हजार 70 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 71 लाख 24 हजार 278 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19 लाख 10 हजार 361 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 9286 व्यक्ती क्वारंटाईन आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in