Cruise Drugs Party: आर्यन खान असलेल्या 'त्या' ड्रग्स पार्टीच्या छाप्याची Inside Story

Inside story of cruise drugs party Raid: मुंबईतील क्रूझवर ड्रग्स पार्टीचा नेमका पर्दाफाश कसा झाला त्याचीच ही Inside Story
Cruise Drugs Party: आर्यन खान असलेल्या 'त्या' ड्रग्स पार्टीच्या छाप्याची Inside Story
inside story cruise drugs party ncb raid aryan khan son of shahrukh khan

मुंबई: मुंबईच्या समुद्रात एका भल्या मोठ्या क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीचा NCB ने पर्दाफाश केला. तब्बल 7 तास कसून चौकशी केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने शाहरूख खानच्या मुलासह 3 जणांना अटक आणि 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

शनिवारी ही क्रूझ मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. तेव्हाच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून क्रूझवर छापा टाकला आणि या हायप्रोफाईल पार्टीचं बिंग फुटलं. एनसीबीला काय-काय सापडलं, पार्टीचं बिंग कसं फोडलं या सगळ्याची इनसाइड स्टोरी आता आपण जाणून घेऊयात

ड्रग्स पार्टीच्या छाप्याची Inside Story

एनसीबीनं एक निवेदन जारी करत संपूर्ण कार्यवाहीची माहिती दिली आहे. दोन ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला. क्रूझवरील सर्वांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. चरस, कोकेन, एमडीएमए ड्रग्ज टॅब्लेट्स आणि एमडी ड्रग्स यावेळी सापडले आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्रूझ पार्टीची एनसीबीला 15 दिवसांपूर्वीच माहिती मिळाली होती. एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितलं, की क्रूझ पार्टीबद्दल शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि जहाजबांधणी मंत्रालयाला सविस्तर अहवाल दिला जाईल. या पार्टीबद्दल आम्हाला 15 दिवसांपूर्वीच गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतरच आम्ही ऑपरेशन सुरू केलं.

एनसीबीचे 22 अधिकारी प्रवाशी बनून क्रूझवर गेले. त्यावेळी क्रूझवर 1800 लोक होते. त्यामधूनच अंमली पदार्थ प्रकरणात 8 लोकांना आम्ही शोधून काढलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी, काही जणांकडून ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या सर्वांनी अत्यंत हुशारीने ड्रग्स आपल्यासोबत आणलं होतं. काही जणांनी हे ड्रग्स आपल्या चप्पल, शर्टची कॉलर, ब्लेट, बॅगेतील हँडल यामध्ये लपवून आणलं होतं. तर काही जणांनी आपल्या अंतर्वस्त्रात देखील ड्रग्स लपवून आणलं होतं.

ड्रग्स पार्टीत शाहरुखचा मुलगाही सापडला

या प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यनचा एक व्हिडिओही एनसीबीच्या हाती लागला आहे. स्वतः एनसीबीनेच चौकशी सुरू असलेल्या आठ लोकांची नावं जाहीर केली आहेत.

यामध्ये आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंह, मोहक जायस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोपडा यांचा समावेश आहे. एनसीबीकडून ताब्यात घेतलेल्या काही लोकांना अटक करण्यासाठीही कार्यवाही सुरू केली आहे.

चौकशीदरम्यान, आर्यन खानने आपल्या क्रूझ पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आल्याचं सांगितलं. तसंच पार्टीत सहभागी होण्यासाठी आपल्याला कुणी पैसे वगैरे दिले नाहीत. आयोजकांनी माझं नाव वापरून लोकांना पार्टीमध्ये बोलावल्याचा दावाही आर्यनने केला.

एनसीबीनं आर्यनचा मोबाईल फोनही जप्त केला आहे. आता एनसीबीला त्याच्या मोबाईलमधून काही धागेदोरे सापडतात का? या प्रकरणात शाहरूख खाननं कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे शाहरूख खानचा स्टँड काय, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

कॉर्डेलिया कंपनीची ही क्रूझ असून ही पार्टी फॅशन टीव्ही इंडिया आणि दिल्लीच्या मानास्केरी एक्सपिरिअन्स नावाच्या कंपनीनं आयोजित केली होती. समुद्रात होणाऱ्या पार्टीसाठी 60 हजार रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंत एंट्री फी आकारण्यात आली होती.

inside story cruise drugs party ncb raid aryan khan son of shahrukh khan
Mumbai Cruise Drugs Party: ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेला आर्यन खान आहे तरी कोण?

लाखो रुपये एंट्री फी भरणाऱ्यांमध्ये बॉलिवूड, फॅशन, बिझनेस क्षेत्रासोबत राजकारण्यांच्या मुलांचाही समावेश असल्याचं समोर येतं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण एनसीबीकडून कसं तडीस लावलं जातं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Related Stories

No stories found.