Facebook सारखंच जगभरात 7 तास इंटरनेट बंद पडू शकतं?

Internet: फेसबुकप्रमाणे जगभरात 7 तास इंटरनेट बंद पडू शकतं का? असा सवाल आता अनेक जण विचारत आहेत. जाणून घ्या त्याचविषयी.
Facebook सारखंच जगभरात 7 तास इंटरनेट बंद पडू शकतं?
internet be shut down for 7 hours worldwide like facebook is it possible

मुंबई: फेसबुकच्या जवळपास सर्व सेवा या जगभरात तब्बल 7 तासांसाठी ठप्प होत्या. कंपनीने अद्याप नेमकी कोणती अडचण उद्भवली होती हे सांगितलेलं नाही, परंतु तज्ज्ञांनी समस्या काय असू शकतात याबाबत आता सांगण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ज्याप्रमाणे फेसबुक हे 7 तासांहून अधिक वेळ बंद पडलं तसंच जगभरातील इंटरनेट हे एकाच वेळी ठप्प होऊ शकतं का? असा सवाल विचारला जात आहे.

जगात इंटरनेट एकाच वेळी ठप्प होऊ शकते का?

जगभरात एकाच वेळी इंटरनेट बंद होणं हे जवळपास अशक्य आहे. कारण इंटरनेट कोणत्याही एका कंपनीद्वारे मॅनेज केले जात नाही. ते सरकार आणि इतर व्यावसायिक संस्थांद्वारे मॅनेज केले जाते. याशिवाय कोट्यवधी लोक इंटरनेट सुरळीत ठेवण्यासाठी काम करत असतात.

जगात इंटरनेटचा एक विशिष्ट असं काही बटण किंवा सिस्टम नाही की, तो बंद किंवा बंद केलं जाऊ शकतं. इंटरनेट ट्रॅफिक हे काही एका ठिकाणाहून नाही तर वेगवेगळ्या ठिकाणांहून सुरु असतं.

तथापि, हे बऱ्याच वेळा पाहिले गेले आहे की, काही देशांमध्ये इंटरनेट खंडित झालं आहे. सरकार कधीकधी विशिष्ट परिस्थिती उद्भवल्यास त्या-त्या ठिकाणचं इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतं. भारतातही अनेक राज्यांमध्ये, विशेषत: काश्मीरमध्ये अनेकदा इंटरनेट बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे.

सरकार देशातील इंटरनेट कधी बंद करतं?

तुम्हाला इंटरनेट कोण देते? दूरसंचार कंपनी किंवा इंटरनेट सेवा प्रदाता. तुम्ही फक्त या दोन ठिकाणाहून इंटरनेट सुविधा घेता. अशा परिस्थितीत, हे सोपे आहे की जर सरकारने या कंपन्यांना इंटरनेट देण्यासच नकार दिला तर आपल्याला इंटरनेट मिळणार नाही.

आता दूरसंचार कंपनी किंवा इंटरनेट सेवा प्रदाता हे कोट्यवधी लोकांना इंटरनेट देतात. असं असताना एकाच वेळी सर्वांसाठी इंटरनेट बंद करणं हे कसे शक्य आहे?

इजिप्तमध्ये 2011 साली असं करण्यात आलं होतं. इजिप्शियन क्रांती दरम्यान, सरकारने चार राष्ट्रीय इंटरनेट सेवा डोमेन नेम सिस्टम (DNS) बंद करण्याचे आदेश दिले होते.

DNS बंद करण्याव्यतिरिक्त, त्यांना त्याच्या सेवेचा बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल बदलण्यास सांगितले गेले. DNS आणि बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल (BGP) मध्ये बदल करून देशभरात इंटरनेट बंद करण्यात आले होते.

फेसबुकचा विचार केल्यास या कंपनीच्या बाबतीत देखील असंच काहीसं घडलं असण्याची शक्यता आहे. फेसबुक सेवा बंद होण्याचे कारण DNS आणि BGP शी संबंधित आहे. कंपनीच्या बीजीपी अर्थात बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल अपडेट दरम्यान काहीतरी चूक झाली आणि यामुळे फेसबुकच्या सर्व सेवा बंद पडल्या असाव्यात.

उल्लेखनीय म्हणजे, ब्रिटनमध्ये सरकारकडे अशी ताकद आहे की राष्ट्रीय संकटाच्या काळात ते देशभरात इंटरनेट बंद ठेऊ शकतात. मात्र, आतापर्यंत असं कधीही करण्यात आलेले नाही.

अशा परिस्थितीत, एका देशात इंटरनेट बंद करणे शक्य आहे. परंतु संपूर्ण जगात एकाच वेळी इंटरनेट बंद होणं शक्य नाही.

पण जगातील बहुतेक देशांमध्ये इंटरनेट ठप्प होण्याची शक्यता आहे. याचे कारण असे की, जर मायक्रोसॉफ्ट, Apple, गुगल, Amazon आणि फेसबुक सारख्या जगातील बड्या कंपन्यांना तिथल्या सरकारने त्यांच्या सर्व सेवा बंद करण्यास सांगितले तर जगभरातील इंटरनेटवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

परंतु अशा परिस्थितीत देखील इंटरनेट एकाच वेळी संपूर्ण जगात ठप्प होऊ शकत नाही. कारण सरकार इंटरनेटचा वापर सुरू ठेवू शकतं.

internet be shut down for 7 hours worldwide like facebook is it possible
Facebook Down: झुकरबर्गला 'एवढ्या' हजार कोटींचे नुकसान, Facbook-Whatsapp ला झालेलं तरी काय?

BGP म्हणजे काय?

DNS प्रमाणेच BGP (Border Gateway Protocol) देखील वेबसाइट डाऊन होण्यामागचं कारण सांगितलं जात आहे. BGP मध्ये IP अॅड्रेस आणि DNS नेमसर्व्हर रुट होतं. असं समजा की, जर DNS हे इंटरनेटचे फोनबुक आहे तर BGP ही त्याची नेव्हिगेशन सिस्टम आहे.

BGP ठरवते की, कोणत्या रुटचा डेटा हा सर्वात वेगाने पोहचेल. त्यामुळे असं म्हटलं जात आहे की, अशीच चूक फेसबुकच्या बाबतीत झाली. DNS रिझोल्यूशन अयशस्वी झाल्यामुळे यूजर्स हे फेसबुकमध्ये अॅक्सेस करु शकत नव्हते.

इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे Cloudflare चे CTO John Graham-Cumming यांच्या मते, फेसबुकने आपल्या राऊटरमध्ये असे काही केलेले असावे की, ज्यामुळे फेसबुकचे नेटवर्क उर्वरित इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकत नव्हतं.

Related Stories

No stories found.