Anil Deshmukh पळाले तर नाही ना? ED कारवाईनंतर किरीट सोमय्यांनी व्यक्त केली शंका

काटोल येथील निवासस्थानावर ईडीची छापेमारी
Anil Deshmukh पळाले तर नाही ना? ED कारवाईनंतर किरीट सोमय्यांनी व्यक्त केली शंका

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीयेत. रविवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या काटोल येथील निवासस्थानी छापेमारी केली. या छापेमारीवेळी देशमुख कुटुंब घरात नव्हतं. ईडीने ३ वेळा चौकशीसाठी समन्स बजावूनही देशमुख चौकशीसाठी हजर राहिलेले नसल्यामुळे ते पळाले तर नाही ना? अशी शंका भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.

१०० कोटींच्या वसुलीप्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीकडूनही चौकशी सुरुवात आहे. रविवारी देशमुख यांच्या काटोल येथील निवासस्थानी करण्यात आलेल्या कारवाईची माहिती ईडीने स्थानिक पोलिसांनी दिलेली नव्हती. देशमुख यांची ४ कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यात त्यांच्या मुंबईच्या निवासस्थानाचाही सहभाग आहे. दरम्यान काटोल येथील घरावरील छापेमारीत ईडीच्या हाती काहीच लागलेलं नसल्याची माहिती समोर येते आहे.

चौकशीसाठी ३ वेळा समन्स पाठवल्यानंतरही देशमुख हजर न झाल्यामुळे ईडी त्यांच्यावर कारवाई कऱण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. अनिल देशमुख यांचा फोनही नॉट रिचेबल लागत असल्यामुळे ईडी त्यांचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे. दरम्यान ईडीने NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझेची तळोजा कारागृहात चौकशी केली. यावेळी सचिन वाझेने आपल्या जबाबात अनिल देशमुखांचा उल्लेख केल्यामुळे देशमुखांवर अटकेची कारवाई होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in