Exclusive : समीर वानखेडेंना टार्गेट केलं जातं आहे का? क्रांती रेडकर म्हणते...

Exclusive : समीर वानखेडेंना टार्गेट केलं जातं आहे का? क्रांती रेडकर म्हणते...

जाणून घ्या काय म्हटलं आहे क्रांती रेडकरने? मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत

आर्यन खान प्रकरणामुळे चर्चेत आलेला NCB चा चेहरा म्हणजे समीर वानखेडे. समीर वानखेडे यांनी जी धडक कारवाई केली त्यामध्ये त्यांनी थेट स्वतःला किंग खान म्हणणाऱ्या शाहरुखच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला अटक केली. त्यांच्या या कारवाईबद्दल त्यांचं कौतुकही होतं आहे. तर त्यांच्यावर आणि NCB वर आरोपही केले जात आहेत. या सगळ्याबाबत त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरला काय वाटतं? या भावना तिने मुंबई तक जवळ व्यक्त केल्या आहेत.

समीर वानखेडेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे का? असं विचारलं असता क्रांती रेडकर म्हणाली 'मला समीर नेहमी सांगतात,'कर्म करो, फल की आशा मत करो. आपलं काम करा आणि त्या कामानं मोठं व्हा. ते नेहमी तसंच मला सांगत आले आहेत. तोच कानमंत्र त्यांनी मला दिला आहे. काम करत राहा बाकी सगळं देव पाहून घेईल यावर माझा विश्वास आहे' असं क्रांती म्हणाली.

मी याआधीही एक गोष्ट सांगितलं आहे की समीर खुपदा घरी नसतात. त्यांचं काम काय आहे कोणत्या मिशनवर आहेत त्याची वाच्यता ते आमच्या कुणाकडेच करत नाहीत. त्यावेळी माझ्या दोन मुलींना सांभाळणं हे सर्वात मोठं काम माझ्याकडे असतं. कधी कधी समीर यांना फक्त दोन तासच झोप मिळते. ते घरी आल्यानंतर घरात एक चांगलं वातावरण निर्माण असावं ही माझी मुख्य जबाबदारी असते. त्यांच्यावर कुठल्याही बाहेरच्या गोष्टीचा प्रभाव पडू नये याची काळजी मी घेते. तसंच बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचा प्रभाव मी स्वतःवरही पाडून घेत नाही असंही क्रांतीने सांगितलं.

आणखी काय म्हणाली क्रांती रेडकर?

मला हे ठाऊक आहे की NCB चे अधिकारी म्हणून समीर वानखेडेंवर अनेक लोकांचं प्रेम आहे. अनेक लोकांचे आशीर्वाद त्यांच्यामागे आहेत असा मला विश्वास आहे असं क्रांती रेडकरने म्हटलं आहे. मला त्याबद्दल व्यक्त व्हावसं वाटलं म्हणूनच मी इंस्टाग्रामवर थँक्स असं म्हणत लोकांना आणि चाहत्यांना रिप्लाय केला. सगळ्या वेळी सगळ्याच लोकांना भेटणं, त्यांचे आशीर्वाद घेणं हे शक्य नसतं म्हणून ती कृती मी केली असंही क्रांतीने म्हटलं आहे. मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत तिने हे वक्तव्य केलं आहे.

Related Stories

No stories found.