ISIS Bomber भारतातील अत्यंत महत्त्वाच्या भाजप नेत्यावर हल्ला करणार होता सुसाइड बॉम्बर, रशियात करण्यात आली अटक

रशियाने य़ा दहशतवाद्याला अटक केल्यानंतर ही माहिती या दहशतवाद्याने दिली आहे
islamic state suicide bomber detained in russia plan to attack on very big indian-bjp leader
islamic state suicide bomber detained in russia plan to attack on very big indian-bjp leaderफोटो सौजन्य-इंडिया टुडे

रशियातील दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने एका आत्मघातकी दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी भाजपच्या एका मोठ्या नेत्यावर सुसाईड बॉम्बरने हल्ला करणार होता. ऱशियातील सरकारी एजेन्सी फेडरले सिक्युरीटी सर्व्हिसने त्याला पकडल्याची माहिती दिली आहे.

नेमकं काय आहे हे ISIS suicide Bomberचं प्रकरण?

रशियाने एका दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे. हा दहशतवादी सुसाइड बॉम्बर आहे. तसंच इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा तो दहशतवादी आहे. भारतातल्या एका बड्या भाजप नेत्यावर तो हल्ला करणार होतो अशी माहिती समोर आली आहे.

एप्रिल ते जून या कालावधीत तुर्कस्तानमध्ये होता दहशतवादी

एप्रिल ते जून या कालावधीत हा दहशतवादी तुर्कस्तानमध्ये होता. तुर्कस्तानमध्ये राहून या दहशतवाद्याने ट्रेनिंग घेतलं होतं. त्याला दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्लेखोर म्हणून तयार केलं. त्यासंदर्भातलं सगळं ट्रेनिंग दिलं.

रशियातील एजन्सीने काय दिली माहिती?

रशियातील एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटनेने या दहशतवाद्याला महत्त्वाच्या कागदपत्रांसह रशियाला पाठवलं. त्यानंतर त्याला इथूनच भारतात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. भारतातील सत्ताधारी पक्ष म्हणजेच भाजपच्या एका बड्या नेत्यावर सुसाईड बॉम्बरने हल्ला करण्याचं काम त्याला देण्यात आलं होतं. नेमकं कुणाला उडवून देण्याची मोहीम या दहशतवाद्याने हाती घेतली होती हे समजू शकलेलं नाही.

फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने या अतिरेक्याचा एक व्हिडीओही जारी केला आहे. या व्हिडीओत त्याने प्रेषक मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप करत बदल्याच्या भावनेने हा हल्ला करणार असल्याचे म्हटले आहे. हा अतिरेकी एप्रिल ते जून दरम्यान तुर्कस्तामध्ये होता, तिथेच एका इस्लामिक स्टेट नेत्याने त्याल आत्मघातकी बनण्याचे ट्रेनिंग दिले. इंस्तांबूलमध्ये त्यांच्या बैठका होत होत्या, अशी माहितीही फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र हा दहशतवादी कुणावर हल्ला करणार हे नाव मात्र समोर आलेलं नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in