'चंद्रकांत पाटलांच्या वैधानिक अभ्यासाबद्दल न बोललेलंच बरं', भास्कर जाधवांची बोचरी टीका

Bhaskar Jadhav: चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन केलेल्या वक्तव्यानंतर आता भास्कर जाधव यांनी याबाबत चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका केली आहे.
'चंद्रकांत पाटलांच्या वैधानिक अभ्यासाबद्दल न बोललेलंच बरं', भास्कर जाधवांची बोचरी टीका
it is better not to talk about chandrakant patils statutory study criticism of shiv sena leader bhaskar jadhav

राकेश गुडेकर, रत्नागिरी: 'चंद्रकांत पाटलांच्या वैधानिक अभ्यासाबद्दल न बोललेचं बरं', असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी बोचरी टीका केली आहे. ते बुधवारी चिपळूणमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका केली.

'विधानसभेच्या अध्यक्षांची निवड गुप्त पद्धतीने घ्यावी, तिथेही महाविकास आघाडीचा पराभव होईल', असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.

'चंद्रकांत पाटील यांना मला एवढच सांगायच आहे की, विधानसभा किंवा राज्यसभा अध्यक्ष असतील यांची निवड करण्याची एक प्रक्रिया आहे. विधानसभेचा अध्यक्ष कोण करावा हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा आहे.' असंही यावेळी भास्कर जाधव म्हणाले.

विधानसभा किंवा राज्यसभा अध्यक्षांच्या निवडीची वैधानिक प्रक्रिया चंद्रकांत पाटील यांना माहित नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. असंही भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदी तुमची निवड होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, की निवड करण्याचे सर्वस्वी अधिकार हे मुख्यमंत्री व महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहेत.

जवळजवळ वर्षभर महाराष्ट्र विधानसभेचं अध्यक्षपद रिक्तच

काँग्रेस नेते नाना पटोलेने यांनी या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ज्यानंतर त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. यावरुन महाविकास आघाडीत काही कुरुबुरी देखील सुरु आहेत.

it is better not to talk about chandrakant patils statutory study criticism of shiv sena leader bhaskar jadhav
Maharashtra Legislative Assembly: 'विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी आमचं निलंबन', गिरीश महाजनांचा मोठा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता विधानसभा अध्यक्षपद सगळ्यांसाठी खुलं झालं आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यावेळी दिली होती. दुसरीकडे हे पद काँग्रेसकडेच राहील असं विधान काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने केलं जात आहे.

खरं तर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया म्हणजे सरकारसाठी एक प्रकारची बहुमत चाचणीच असते. विधानसभा अध्यक्ष निवडणूक हा अत्यंत नाजूक असा विषय असल्याने तीनही पक्ष आता होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कशा पद्धतीने हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नाना पटोले यांना जेव्हा विधानसभा अध्यक्ष करण्याचा निर्णय झाला तेव्हा महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकमताने त्यांच्या नावाला सहमती दर्शवली होती. आता नाना पटोलेंनंतर कुणाला विधानसभा अध्यक्ष केलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड केली जाईल तेव्हा महाविकास आघाडीला एका अर्थाने परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in