ITR Filing : करदात्यांना केंद्राचा दिलासा; प्राप्तिकर परतावा भरण्याला मुदतवाढ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्र सरकारकडून प्राप्तिकर भरण्याची मुदत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. प्राप्तीकर परतावा भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आयकर विभागाने इन्कम टॅक्स इंडिया या ट्विटर हॅण्डलवरून याची माहिती दिली.

कोरोना प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने आयकर भरण्याची मुदत आधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कालावधी वाढवण्यात आला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

सीबीडीटीने २०२१-२२ या वर्षासाठी प्राप्तीकर परतावा आणि ऑडिटची वेगवेगळे रिपोर्ट दाखल करण्याच्या तारखांना मुदतवाढ दिली आहे. आयकर कायदा, १९६१ नुसार २०२१-२२ साठी प्राप्तिकर परतावा आणि ऑडिटचे वेगवेगळे रिपोर्ट दाखल करण्यास करदात्यांसह इतरांना रिपोर्ट दाखल करण्यास अडचणी येत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भेडसावत असलेल्या समस्या लक्षात घेऊन केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) वर्ष २०२१-२२ साठी प्राप्तीकर रिटर्न आणि ऑडिटसह विविध रिपोर्ट्स दाखल करण्याच्या निर्धारित तारखांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, असं ट्वीटमध्ये म्हटलेलं आहे.

ITR भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 पर्यंत होती; ती आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना वर्ष अखेरीपर्यंत प्राप्तिकर परतावा भरता येणार असून मोठा दिलासा मिळाला आहे.

ADVERTISEMENT

PAN-Aadhaar लिंक करण्याची शेवटची संधी, आता वेळ दवडू नका, पाहा कसं करता येणार लिंक

ADVERTISEMENT

प्राप्तिकर परतावा अर्थात इनकम टॅक्स रिर्टन कसे भरायचे?

–प्राप्तिकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न) भरण्यासाठी आधी आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. तुमचा पॅन तपशील, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरल्यानंतर ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

–त्यानंतर ई-फाइल मेनूवर क्लिक करा आणि इन्कम टॅक्स रिटर्न (प्राप्तिकर परतावा) लिंकवर क्लिक करा.

–आयकर रिटर्न पेजवर पॅन ऑटो पॉप्युलेट होईल, येथे मूल्यांकन वर्ष निवडा आणि आता आयटीआर फॉर्म क्रमांक निवडा. आता फायलिंग प्रकार निवडा ज्यामध्ये मूळ /सुधारित रिटर्न निवडावे.

–यानंतर, आता सबमिशन मोड निवडा ज्यामध्ये ऑनलाईन तयारी आणि सबमिट निवडावं लागेल.

–नंतर Continue ऑप्शनवर क्लिक करा. हे केल्यानंतर पोर्टलवर दिलेली मार्गदर्शक तत्वे (Guidelines) वाचा. ऑनलाईन आयटीआर फॉर्ममध्ये रिक्त असलेल्या सर्व फिल्डमध्ये आपले तपशील भरा.

–पुन्हा कर आणि पडताळणी टॅबवर जा आणि तुमच्यानुसार सत्यापन पर्याय निवडा. पूर्वावलोकन आणि सबमिट बटणावर क्लिक करा, ITR मध्ये प्रविष्ट केलेल्या माहितीची पडताळणी करून घ्या. शेवटी ITR सबमिट करा.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT