भुसावळ: 46 वर्षीय पत्नीने 50 वर्षीय पतीचा गळा आवळून केली हत्या, नेमकं काय घडलं?

भुसावळ: 46 वर्षीय पत्नीने 50 वर्षीय पतीचा गळा आवळून केली हत्या, नेमकं काय घडलं?
jalgaon crime bhusawal 46 year old wife strangled 50 year old husband to death what exactly happened

मनीष जोग, जळगाव: दारूच्या व्यसनाला आहारी गेलेल्या पतीकडून सतत मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल करुन तिला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश प्रभाकर महाजन (वय 50 वर्ष) राहणार लक्ष्मी नारायण नगर असे मयत पतीचे नाव असून सीमा गणेश महाजन (वय 46 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

गणेश महाजन व सीमा महाजन हे दाम्पत्य लक्ष्मी नारायण नगरात वास्तव्यास होते. गणेश महाजन याला दारुचे व्यसन जडले होते. त्यामुळे दररोज दारू पिऊन घरी आल्यावर पत्नीशी वाद घालणं, मारहाण करणे हे नित्याचं झालं होतं. गणेश महाजन दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नी सीमा हिने त्याला दोन दिवस जेवण दिलं नाही.

त्यानंतरही काही दिवसांनी गणेश असाच दारू पिऊन घरी आला. याच संतापाच्या भरात सीमा महाजन हिने नायलॉनची दोरी गणेशच्या गळ्याला आवरून त्याचा खून केला. त्यानंतर सीमा महाजन यांनी पुरावे नष्ट करुन पतीने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी तिने सर्वांना भासवलं.

याप्रकरणी सुरुवातील भुसावळ येथील बाजारपेठ पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, अपमृत्यू झाल्याच्या चौकशीमध्ये वैधकीय अधिकारी यांचा अभिप्राय व आरोपी व साक्षीदार यांची चौकशी केल्यानंतर ही आत्महत्या नसून खून असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ सीमा महाजन हिला अटक केली. सध्या याप्रकरणी पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in