'उत्तर प्रदेशात जालियनवाला बागसारखी परिस्थिती', लखीमपूर घटनेवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

जाणून घ्या आणखी काय काय म्हणाले आहेत शरद पवार?
'उत्तर प्रदेशात जालियनवाला बागसारखी परिस्थिती', लखीमपूर घटनेवर शरद पवार यांची  प्रतिक्रिया

लखीमपूर या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराबाबत देशभरातून संताप व्यक्त होतो आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या सगळ्या बाबत उत्तर प्रदेश सरकार आणि मोदी सरकार यांच्याकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात जालियानवाला बाग सारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

या हिंसाचारामध्ये ज्यांचे जीव गेले त्याची जबाबदारी भाजपशासित दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारचीच आहे. मी या हिंसाचाराचा निषेध करतो. पण फक्त निषेध करून आम्हाला शांती मिळणार नाही. या प्रकरणाचा तपास,चौकशी केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध पानी का पानी झालं पाहिजे. या प्रकारामुळे केंद्र सरकारची नियत काय आहे, हे दिसून येतं आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणून ते शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत. हातात असलेल्या ताकदीचा गैरवापर केला जात आहे. शेतकऱ्यांनो, भले तुमच्यावर हल्ला झाला असेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

'उत्तर प्रदेशात जालियनवाला बागसारखी परिस्थिती', लखीमपूर घटनेवर शरद पवार यांची  प्रतिक्रिया
लखीमपूर खीरी : शेतकऱ्यांना गाडीने उडवतानाचा 'तो' व्हिडीओ आला समोर

आणखी काय म्हणाले शरद पवार?

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग आंदोलन करत आहे, शांतीने आंदोलन सुरू आहे, मात्र २६ जानेवारीला त्यांच्यावर हल्ला केला गेला, ज्याच्या प्रतिक्रिया पूर्णपणे देशभर उमटल्या. लोकशाहीमध्ये शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. लखीमपूर इथं जमलेले शेतकरीही शांततेने आंदोलन करत होते, आमच्या मागण्या मांडत होते. मात्र त्यांच्या अंगावर गाडी चढवण्यात आली. ज्यात काही जणांचा मृत्यू झाला. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो.

काय आहे प्रकरण?

लखीमपूर खीरी येथील घटनेनं अवघा देश हादरला. लखीमपूर खीरीत झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. घटना नेमकी कशी झाली याबद्दल प्रत्यदर्शीकडून सांगण्यात आलं. मात्र, आता या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेसनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान या व्हिडीओबद्दल पोलीस किंवा प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे 3 ऑक्टोबर रोजी भयंकर घटना घडली. यात 8 आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. कुस्ती दंगल कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी येत असलेल्या उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या विरोधात किसान मोर्चाचे शेतकरी निदर्शनं करत होते. यावेळी ही घटना घडली.

Related Stories

No stories found.