'फ्लेचर पटेल लष्कराचा जवान, ड्रग्ज पकडले जातायत म्हणून त्रास होतोय का?'

नवाब मलिकांनी उल्लेख केलेल्या लेडी डॉन जास्मिन वानखेडेंचं स्पष्टीकरण
'फ्लेचर पटेल लष्कराचा जवान, ड्रग्ज पकडले जातायत म्हणून त्रास होतोय का?'

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासोबत फ्लेचर पटेल या व्यक्तीचे फोटो टाकत NCB च्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. NCB ने धाड टाकलेल्या तिन्ही प्रकरणांमध्ये फ्लेचरच पंच म्हणून कसे असा प्रश्न विचारत नवाब मलिक यांनी विचारला. याचसोबत फ्लेचर पटेलचा समीर वानखेडे यांच्या बहिणी जास्मिन वानखेडे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत नवाब मलिकांनी प्रश्न उपस्थित केला.

नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांवर जास्मिन वानखेडे यांनी मुंबई तक शी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

"आमच्यावर जे काही आरोप झालेत ते सर्व चुकीचे आहेत. फ्लेचर पटेलबद्दल तुम्हाला थोडसं माहिती असायला हवं म्हणून सांगते...फ्लेचर भारतीय लष्कराचा जवान आहे. तो भारतासाठी युद्धभूमीवर तैनात होता. त्याने LOC वर देशाचं रक्षण केलंय. नेव्ही असो किंवा आर्मी या व्यक्तींना सगळीकडे आदर मिळतो. तो माझा मानलेला भाऊ आहे मी त्याला राखी बांधते. आता या सर्व गोष्टी अशा पद्धतीने कशाकाय बाहेर आल्या हे मला माहिती नाही. पण ज्याने कोणी हे केलं असेल ते खूप वाईट केलंय. मी महिला आणि मुलांच्या हक्कांशी संबंधित NGO चालवते. यासाठी मला अनेकदा नेव्ही किंवा आर्मीतल्या लोकांची मदत लागते. फ्लेचर हा आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गरीब आणि गरजू मुलांना फिटनेस आणि खेळाचं प्रशिक्षण देतो", असं स्पष्टीकरण जास्मिन वानखेडेने दिलं आहे.

मी नेहमी सत्याच्या बाजूने उभी राहते. महिला आणि मुलांच्या प्रश्नासंदर्भात मला जेव्हा ट्रेनिंगची गरज असते तेव्हा मी फ्लेचरला फोन करते म्हणून त्याने मला कदाचीत लेडी डॉन म्हटलं असावं. गरीब मुलं असो किंवा महिला त्यांना अनेक घटनांमध्ये लवकर न्याय मिळत नाही, अशी लोकं माझ्याकडे मदतीसाठी येतात. या कारणासाठी त्यांनी मला लेडी डॉन म्हटलं असेल पण या गोष्टीचा जर चुकीचा अर्थ काढला जात असेल तर मी माझा लढा असाच सुरु ठेवीन. गरज पडल्यास याविरुद्ध मी मानहानीचा खटलाही दाखल करेन अशी भूमिका जास्मिन वानखेडे यांनी मांडली आहे.

'फ्लेचर पटेल लष्कराचा जवान, ड्रग्ज पकडले जातायत म्हणून त्रास होतोय का?'
क्रूझ ड्रग्ज केस: प्लेचर पटेल आणि NCB अधिकाऱ्यांचा काय संबंध? नवाब मलिकांचा ट्विटरद्वारे आणखी एक गौप्यस्फोट

NCB ने केलेल्या ३ छापेमाऱ्यांमध्ये फ्लेचर पटेलचं नाव पंच म्हणून नोंद असल्याबद्दल जास्मिन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, याबद्दल मला फारसं काही माहिती नाही. तुम्ही संबंधित व्यक्तींशी बोला. पण जबाबादार व्यक्ती अशा घटनांमध्ये कधी चूक करु शकत नाही असं स्पष्टीकरण दिलं. मी कायद्याला आणि संविधानाला मानणारी भारतीय नागरिक आहे. जर यानंतरही माझ्या बदनामीचा प्रयत्न सुरु राहिला तर मी मानहानीचा दावा करेन असा इशारा जास्मिन यांनी नवाब मलिक यांचं नाव न घेता केला आहे.

ड्रग्जचा पर्दाफाश होत असेल, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडले जात असतील तर ही लोकं एवढी थयथयाट का करतायत? त्यांना एवढा प्रॉब्लेम का होतो आहे हा माझा प्रश्न आहे. NCB जर या देशात छापेमारी करुन ड्रग्ज नष्ट करत असेल तर ते चांगलंच आहे. मग अशा घटनांमध्ये धर्म, जात असे विषय आणून वैय्यक्तित हल्ला का केला जातोय? ड्रग्ज पडकले जातायत, कोण पकडलं गेलंय याबद्दल बोला ना. एकतर या व्यक्तींच्या घरात ड्रग अॅडीक्ट असतील किंवा त्यांना ड्रग्ज मिळत नसतील म्हणून एवढा त्रास होत असेल असंही जास्मिन वानखेडे म्हणाल्या.

नवाब मलिकांनी आपल्या पत्रकार परिषदेत लेडी डॉन म्हणजेच जास्मिन वानखेडेच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे का असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे नवाब मलिकांच्या या आरोपांवर आता NCB काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

'फ्लेचर पटेल लष्कराचा जवान, ड्रग्ज पकडले जातायत म्हणून त्रास होतोय का?'
Nawab Malik: 'तीन केसमध्ये एकच पंच कसा?', NCB... फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन; नेमकं प्रकरण काय?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in